शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

ग्राहकराजा ठरतोय दुर्लक्षित भिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:06 IST

ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हटले जाते. त्याला मोठेपण देण्याची एक पद्धत आहे. मात्र, सध्याच्या बाजारपेठेतील प्रकार पाहता करोडोंच्या गर्दीत हा राजा कायमच एकटा असल्याने त्याला भिका-यासारखी दुर्लक्षित जागा मिळत असल्याचे चित्र आहे.

पुणे : ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हटले जाते. त्याला मोठेपण देण्याची एक पद्धत आहे. मात्र, सध्याच्या बाजारपेठेतील प्रकार पाहता करोडोंच्या गर्दीत हा राजा कायमच एकटा असल्याने त्याला भिका-यासारखी दुर्लक्षित जागा मिळत असल्याचे चित्र आहे. बांधकाम व्यावसायिक..टेलिकॉम कंपन्या...कॉफी, टूथपेस्ट, शाम्पू, साबण, उदबत्ती अशा दैनंदिन वस्तूंच्या वापरातही ग्राहक नाडला जात आहे. विशेष म्हणजे आपल्या गावी देखील नसते.  अनेकदा आपण एखाद्या मॉलमध्ये जातो, तेथे एकावर एक फ्री अशा असंख्य ‘आॅफर’ दिलेल्या असतात. त्याला भुरळून आपणही गरज नसताना एकच हॅण्डवॉश हवा असला तरी दोन-चार विकत घेतो. मात्र या कंपन्या अशा जाहीराती लोकमानस ओळखून करीत असतात. प्रत्यक्षात वस्तूचे वजन, त्यानुसार त्याची किंमत असा ताळेबंद मांडल्यास आपण अक्षरश: फसवले गेलेला असतो. मात्र, बहुतांश ग्राहक असा ताळेबंद कधीच मांडत नाही, याची पक्की खात्री या कंपन्यांना असते. जर एखादा ग्राहक भांडायला लागला तरी तो लवकरच हा नाद सोडून देईल अशी व्यवस्था देखील कंपन्यांच्या विपणन, टेलिसर्व्हीसेस विभागाच्या वतीने चोख केलेली असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर टेलिकॉम कंपन्यांचे घेता येईल. ‘फोर’जी म्हणणाºया सर्वच कंपन्यांचा स्पीड टूजी तरी आहे का ? असा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडत असेल. ठराविक भागात इंटरनेटला चांगला स्पीड..तर काही भागात रेंजच नाही...अगदी काही केबीचे फोटो देखील फोरजीवर उघडण्याची वाट पाहावी लागते. गंमत म्हणून त्याची तक्रार ईमेलद्वारे संबंधित कंपनीला केल्यास कंपनी कशापद्धतीने उडवून लावते हा अनुभव घेण्यासारखा ठरेल. खरेतर असा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहीजे. नुकतेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने एकावर एक फ्री देणा-या कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतात ते उघड केले. त्यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीचे आणि वजनाचे सर्वेक्षण केले. त्यात प्रतिथयश कंपनीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाची क्रिम, जंतूनाशक कंपन्यांचे साबण, दररोजच्या वापरातील साबण, थंडीपासून त्वचेचे संरक्षण करणारी पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणा-या कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांची पाहणी करण्यात आली.या उत्पादनांची लहान आकाराची वस्तू आणि मोठ्या आकाराची वस्तू, त्याचे वजन, त्यावरील महत्तम विक्री किंमत (एमआरपी) याचा अभ्यास केला. त्यात लहान वजनाच्या वस्तूच्या तुलनेत मोठ्या वजनाची वस्तू दीडपट ते तिपटीहून अधिक महाग असल्याचे समोर आल. कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूला बनविण्याचा प्रत्यक्ष खर्च, वेष्टनावर आलेला खर्च यावर ठरते. त्यानंतर वितरक, दुकानदार त्यांचा नफा अशी किंमत धरुन एमआरपी ठरविली जाते. मात्र, टूथपेस्ट कंपन्या एकाच दर्जाची ५० ग्रॅम वजनाची टूथपेस्ट २० रुपये आणि दीडशे ग्रॅम वजनाची पेस्ट ९२ रुपायंना विकतात. म्हणजेच दीडशे ग्रॅम वजनाच्या टूथपेस्टची किंमत ६० असताना त्याची ३२ रुपये अधिक किंमतीने विक्री केली जाते. वेष्टनावर इतका खर्च केला जातो की काय ? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, हा प्रकार तुम्हाला एकावर एक वस्तू खपविण्यासाठी असतो. मोठ्या आकाराच्या वस्तूंची किंमतच अधिक आकारायची. मग काय कितीही सवलतीचा पाऊस पाडता येतो. ग्राहकही सवलतीच्या (?) पावसात चिंब भिजतो. उदबत्तीच्या वजनातील चोरी देखील ग्राहक पंचायतीने पकडली आहे. या समोर आलेल्या घटना आहेत. राजा म्हणवला जाणारा ग्राहक गर्दीतीली एकटा असल्याने त्याकडे भिकाºयाच्या दृष्टीने पाहण्याची अथवा वागविण्याची बाजाराची मानसिकता आपणच मोडू शकतो. त्यासाठी ग्राहकहितासाठी काम करणाºया संस्थांकडे आणि प्रत्यक्ष संबंधित कंपनीकडे ई-मेलद्वारे तक्रार करा. स्मार्ट झालेला मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलाय, आता ग्राहकही स्मार्ट झालाय हा पक्का संदेश अशा कंपन्यांकडेही गेला पाहीजे.  

ग्राहक पंचायतीने पाहणी केलेल्या वस्तू आणि किंमतीतील तफावत

वस्तू                कमी वजन (कंसात किंमत)        अधिक वजन (कंसात किंमत)    किंमतीतील तफावतीची टक्केवारी

टूथपेस्ट            ५० ग्रॅम (२०)            १५० ग्रॅम (९२)            १५३ 

गोरेपणाचा दावा करणारी क्रिम    १५ ग्रॅम (२०)            २५ ग्रॅम (५०)            १५०

स्नो पावडर (चेह-याची)        २५ ग्रॅम (१०)            ५० ग्रॅम (३९)            १९५

जंतूनाशक साबण        ४५ ग्रॅम (१०)            ३०० ग्रॅम (१०३)            १५६

अंगाचा साबण            ६२ ग्रॅम (१०)            १२५ ग्रॅम (२८)            १३९

ताजगी देणारा चहा        १०० ग्रॅम (३०)            १ किलो (४१०)            १३९

कपडे धुवण्याची पावडर        ८५ ग्रॅम (१०)             दीड किलो (२४९)        १४१

पेट्रोलियम जेली            ७ ग्रॅम (५)            ४२ ग्रॅम (६७)            २२३

कंडिशनर            २० एमएल (१०)            २०० एमएल (१८५)        १८५

कॉफी                साडेसात ग्रॅम (१०)            ५० ग्रॅम (१३०)            १९५

भक्तीच्या दरवळातही होतेय चोरीग्राहक पंचायतीचे पुणे अध्यक्ष विजय सागर यांनी मिलिटरी कँटीनमधून एका ब्रँडचे उदबत्तीचे पाकिट खरेदी केले होते. त्यावर ३० ग्रॅम वजन आणि ४१ रुपये एमआरपीचा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्षात उदबत्तीचे वजन केवळ १९ ग्रॅम भरले. तर, त्याच्या पाकिटाचे वजन ३५ ग्रॅम आहे.

टॅग्स :Puneपुणे