नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी यायला हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:32+5:302021-06-22T04:08:32+5:30

केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे : श्री आनंद ग्रुपच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन पुणे : मुलांवर कोरोनाचा मोठा परिणाम ...

Negative things should be kept to a minimum in front of children | नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी यायला हव्यात

नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी यायला हव्यात

केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे : श्री आनंद ग्रुपच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन

पुणे : मुलांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. मुले अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट ते पटकन विसरत नाहीत. कोरोनाविषयक नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी येतील आणि मानसिकदृष्ट्या ते खचणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. मुले दिवसभर घरी असतात त्यामुळे आईवडिलांनी मुलांमध्ये मिसळायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

श्री आनंद ग्रुपच्या वतीने ‘कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर झालेला परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये संजय धोत्रे, बोलत होते. डिजिटल शिक्षणतज्ञ हर्षल विभांडिक, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मानकर, तसेच विद्यार्थी, पालक,शिक्षक सहभागी झाले होते.

चर्चासत्राचे संयोजन आनंद रेखी, डॉ. धर्मेंद्र शाह, डॉ. राजेश पवार, संकेत खरपुले, सौरभ लोखंडे, आशिष अभ्यंकर, महेश कुलकर्णी, नगरसेवक कुंदन गायकवाड, सागर हिंगने तसेच विजय चोरडिया, पारस यादव, मधुकर पाठक यांनी केले.

Web Title: Negative things should be kept to a minimum in front of children