शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नीरा नदीवरील बंधारे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:59 IST

येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.

भोर  - येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.दगडी बंधाºयांपैकी सर्वच बंधाºयांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले आहेत. आलेले पाणी वाहून गेल्याने शेतीच्या पाणी उपसा योजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. काही दिवसांत नळपाणीपुरवठा योजनाही अडचणीत येतील. मात्र पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक बंधाºयांचे सिमेंट, दगड निघाले असून, मोठमोठी भगदाडं पडली आहेत. मोºया वाहून गेल्या असून, अनेक ठिकाणचा स्लॅब पडला आहे. पिलर वाहून गेल्यामुळे बंधाºयावरून अलीकडे व पलीकडे जाता येत नाही. पायातून पाणी वाहून जात आहे.अनेक वर्षांपासून पाणीसाठाच होत नाहीअशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात बंधाºयाच्या पाण्यावरअवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार,पोम्बर्डी, शिंद, वेनवडीया गावच्या नळपाणीपुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात.त्यामुळे बंधाºयांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्रयाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बंधारे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. दोन वर्षांत काहीच मंजुरी मिळाली नाही.असून अडचण नसून खोळंबा...आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गळती लागल्याने अनेक बंधाºयांत पाणीसाठा होत नसल्याने ते कोरडे पडतात. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोेग होत नसल्याने बंधाºयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे सदर बंधाºयांची दुरुस्ती करण्याची मागणी येवलीचे माजी सरपंच सुनील धुमाळ यांनी केली आहे.शिंद, वेनवडी, येवली व वडगाव येथील बंधाºयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.त्याला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या