शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक

By admin | Updated: August 6, 2016 00:52 IST

गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत

सोमेश्वरनगर : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व शाळा क्र. २मध्ये गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने ३१ आॅगस्टपर्यंत याकडे लक्ष न दिल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा नीरेचे उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह १० सदस्यांनी दिला आहे. नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व २ या शाळांमधून सुमारे ७०० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही २० शिक्षकी शाळा असून पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी प्राथमिक शाळा आहे. मात्र, प्रशासन या शाळेकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्याने ७०० मुलांना जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. आज नीरेतील ग्रामस्थ, ग्रामपंचयात सदस्य व शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी अचानक शाळेची पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक परिस्थिती पुढे आली. या शाळेमध्ये एकूण २५ वर्गखोल्या आहेत. यातील १० ते १२ वर्गखोल्यांचे छत गळत आहे. काही वर्गखोल्यांमधून तर चक्क पाणी भरले आहे. मुलांना पाण्यामध्येच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचा वरील मजला पूर्णत: खिळखिळा झाला आहे. स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. बिम वाकले आहेत. तसेच पूर्णत: बांधकाम झुकले आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. वास्तविक या शाळेची जागा नीरा ग्रामपंचायतीची आहे. जिल्हा परिषद नीरा ग्रामपंचायतीला दर महिन्याला २३ हजारप्रमाणे वर्षाला ३ लाख रुपये भाडे देते. मात्र, हे भाडे ५ वर्षापासून दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेकडे १५ लाखांच्या आसपास भाडे येणे असल्याने या शाळेची डागडुजी होऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेने याची डागडुजी करत न बसता नवीन इमारत बांधावी अशी मागणी होत आहे. या वळी उपसरपंच दीपक काकडे म्हणाले, जिल्हा परिषद व राज्य सरकार या शाळेत शिकणाऱ्या ७०० मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे. या वेळी नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, उपसरपंच दीपक काकडे, सदस्य बाळासाहेब भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे राधा माने, सुदाम बंडगर, सतीश गालिंदे, अप्पा दारोळे, हरिभाऊ जेधे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>शाळेची एवढी दयनीय अवस्था झालेली असतानाही याकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे. त्यामुळे या शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.तसेच याबाबत ३१ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा काकडे यांनी दिला आहे.