शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नीरा देवघर, भाटघर धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:45 IST

पाणी योजना संकटात : मे महिन्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार, पाण्याचे नियोजन करण्याची मागणी

भोर : यंदा नीरा देवघर व भाटघर धरणे १०० टक्के भरली होती. मात्र दोन महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. उन्हाळ््याला अद्याप ४ महिने शिल्लक आहे तोपर्यंत पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास दोन्ही धरणातील पाणीसाठा कमी होऊन धरण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

आॅक्टोबर महिन्यात पाऊस थांबला. लगेच नोव्हेंबर महिन्यापासून भाटघर धरणातून गेल्या दोन महिने १८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ७३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नीरादेवघर धरणातून ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. मागील वर्षी यावेळी नीरादेवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा होता. सध्या धरणात ७० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा आहे. कालवे नसल्याने दोन्ही धरणातील पाणी नदीतून खाली जात आहे.भोरच्या पाण्यावर खालील भागातील बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. मात्र दरवर्षी भाटघर धरणातील २४ टीएमसी, नीरादेवघर धरणातील १२ टीएमसी व चापटे गुंजवणी धरणातील ४ टीएमसी असे एकूण ३८ टीएमसी पाणी दर पावसाळ््यात साठवले जाते. उन्हाळा आला, की धरणे रिकामी होतात. स्थानिकांना मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.भाटघर धरण ब्रिटिशकाळात बांधले गेले. त्यामुळे धरणाला तालुक्यासाठी कालवे नसतील. मात्र नीरादेवघर धरण होऊन १५ वर्षे झाली, मात्र अद्यापही धरणाचा उजवा कालवा अपूर्ण तर डावा कालवा कागदावरच आहे. त्यामुळे नीरा नदीतून सोयीस्करपणे पाणी खाली जात आहे. स्थानिकांना पाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे उद्योगव्यवसाय नसलेल्या तरुणांचे बागायती शेती करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून पुण्या-मुंबईला जाऊन हॉटेलात, हमाली, दुकानात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवतात.धरण उशाला, कोरड घशाला...भोर तालुक्यातील दोन्ही धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ््यात पुन्हा रिकामी होतात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे येथील लोकांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली असून दोन्ही धरणाच्या पाण्यावर तयार होणारी वीजही स्थानिकांना मिळत नाही.भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे नागरी सुविधांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, म्हणून शासनदरबारी हेलपाटे मारीत आहेत.अनेक धरणग्रस्त मातीआड गेले. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यासाठी आमदार संग्राम थोपटे व धरणग्रस्त संघटना प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे