शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर धावणार : हर्षवर्धन पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 19:42 IST

कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती; चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार 

लाखेवाडी : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून सीएनजी गॅसवर धावणार आहेत. राज्यातील साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल असून, निरा भीमा कारखान्यावरतीच सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.30) दिली.

मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी आज बैठक पार पडली. चालू वर्षीपासून नीरा भीमा कारखान्याचे ऊस वाहतूकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर प्रायोगिक चालणार चालविले जाणार आहेत. राज्यात नीरा भीमासह एकूण 5 साखर कारखान्यांमध्ये सीएनजी गॅसवर प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅक्‍टर चालविण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरच्या इंधन खर्चात सीएनजी गॅस वापरामुळे  सुमारे  50 टक्के बचत होणार आहे तसेच ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढून प्रदूषणातही घट होणार आहे. शिवाय कारखान्यांचा ऊस वाहतुकीचा खर्च कमी होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्य अधिकारी संभाजीराव कडू-पाटील, नॅचरल शुगरचे अध्यक्ष  बी.बी.ठोंबरे, प्रा.एस.व्ही.पाटील, केंद्र सरकारच्या मध्यवर्ती रस्ते वाहतूकचे अधिकारी राजेंद्र सानेर-पाटील, विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, निरा भिमा कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, के.ए.गायकवाड आदी उपस्थित होते.

नीरा भीमावरती चालू वर्षी देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प नीरा भिमा सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू वर्षीपासून बायोमासवर आधारित देशातील पहिला बायोसीएनजी गॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरसाठी लागणारा सीएनजी गॅस हा कारखान्यावरती उपलब्ध होणार आहे. तसेच  भविष्यात इंदापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्यासाठी सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे कारखान्याची धोरण आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या इंधन खर्चात मोठी बचत होऊन मोठा आर्थिक फायदा होणार आहे. वाहनांच्या वाढत्या इंधन खर्चात बचत करणेसाठी सीएनजी गॅस वापरणे हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेharshvardhan patilहर्षवर्धन पाटील