शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे सलग २५ वर्षे निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 23:26 IST

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे.

लाखेवाडी: शहाजीनगर येथील निरा-भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (१३ मार्च) सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन १९९९ मध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. 

नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्या देशातील व राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण शेतकऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील ४६ गावांमधील सभासदांनी व  कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

बावडा गट: हर्षवर्धन शहाजीराव पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उमेश अच्युतराव पाटील 

पिंपरी गट: प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, विजय दत्तात्रय घोगरे.

सुरवड गट: महेशकुमार दत्तात्रय शिर्के, दादासो उत्‍तम घोगरे, सुभाष किसन गायकवाड 

काटी गट : लालासो देविदास पवार, राजकुमार वसंतराव जाधव, विलास रामचंद्र वाघमोडे 

रेडणी गट : आनंदराव नामदेव बोंद्रे, राजेंद्र व्यंकट देवकर, दत्तू यशवंत सवासे 

अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्ग: राहुल अरुण कांबळे 

इतर मागास प्रवर्ग: कृष्णाजी दशरथ यादव 

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग: रामचंद्र नामदेव नाईक 

ब वर्ग सभासद प्रवर्ग : भाग्यश्री हर्षवर्धन पाटील 

महिला राखीव प्रवर्ग: संगिता दत्तात्रय पोळ, कल्पना निवृत्ती शिंदे 

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहाय्यक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.

हर्षवर्धन पाटलांच्या प्रतिष्ठितेसाठी निवडणूकीतून माघार -उदयसिंह पाटील

कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा तहसील कार्यालयामध्येच शेवटच्या दोन मिनिटात घेतला. उदयसिंह पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपला निर्णय कायम ठेवला. 

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भाग्यश्री बंगला येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, 'सध्या आपले नेते हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत, त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते.' 

'भाऊच्या राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी पदासाठी वेळ प्रसंगी नाराज न होता एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे', असे उदयसिंह पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, 'कोणाचेही अडचणीचे राजकीय दिवस कायम राहत नसतात. तसेच कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून यावेळी घेतले जाईल.'

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Puneपुणे