शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या शुद्धीकरणासाठी आत्मदृष्टी हवी - डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:55 IST

केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

आळंदी - केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह यांना पहिला पसायदान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी, त्या कामाला योग्य दृष्टीची जोड मिळाली नाही, तर ते काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी नदीवर प्रेम करणे, तिला समजून घेणे आवश्यक आहे. मी हाती घेतलेल्या नदी संवर्धनाच्या कार्यात कोणत्याही राजकारण्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि कोणत्याही कॉपोर्रेट कंपनीला पाण्याचा एकही थेंब दिला नाही. कारण नदीच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा असतो. समाजात ज्ञानाचा दीप लावून कार्र्य पुढे नेण्यासाठी आपण पसायदानाचे तत्व अंगीकारले पाहिजे.’कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘आजच्या समाजातही दहशत आणि भितीचे वातावरण आहे. त्यात फारसा फरक पडलेलला दिसत नाही. ज्ञानेश्वरांप्रमाणे आजच्या काळातही कोणीतरी आशेचा किरण दाखविण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांची सुमारे शंभर साहित्य संमेलने होतात, ही अतिशय महत्त्वाची बाब असून हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.’डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्री आणि पुरूष असा भेद न करता आपण सगळे प्रकृती आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पंचतत्वांच्या मूळावर आज आपण घाव घालत आहोत. त्यातून आपण विनाशाकडे जात आहोत, असे वाटते. प्रकृतीच्या संवधार्नाचा, सृष्टीच्या संपन्नतेचा वारसा जपण्याचा निर्धार या संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.’प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे