शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूळव्याधीविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज : सदानंद सरदेशमुख यांनी परिसंवादात व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:11 IST

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.

ठळक मुद्देमूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता नाही : डॉ. कुणाल कामठेबसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक : डॉ. नंदकुमार बोरसे

पुणे : मूळव्याधीविषयी अजूनही लोकांमध्ये जागरुकता दिसत नाही. या आजारावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असून समाजामध्ये जनजागृती व्हायला हवी. या आजाराविषयी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे, असे मत सेंट्रल काऊन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनचे सदस्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी व्यक्त केले.जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. नितीन बोरा, डॉ. धनराज गायकवाड, डॉ. नंदकुमार बोरसे, कर्नल संभाजी पाटील, अ‍ॅड. प्रताप परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाईल्स केअर या अ‍ॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सरदेशमुख म्हणाले, ‘मूळव्याध या आजाराच्या उपचारांविषयी असलेल्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी तपासल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.’  डॉ. कुणाल कामठे म्हणाले, ‘मूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता दिसून येत नाही. त्यामुळे या आजाराकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्नपदार्थ, जंक फूड टाळले पाहिजेत. दैनंदिन जीवनात आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास अशाप्रकारचे आजार होणार नाहीत.’ डॉ. मिलींद भोई म्हणाले, ‘खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढले आहे. या आजाराविषयी जागृती होण्यासाठी लोकशिक्षण, लोकसभा अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.’ डॉ. नंदकुमार बोरसे म्हणाले, ‘बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. फळभाज्या, पालेभाज्यांचा अधिक वापर, डाळीचे पदार्थ कमी खाणे, ताक पिणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टींचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.’ यावेळी कर्नल संभाजी पाटील, शिवकुमार गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे