प्रातिनिधिक निवड पद्धत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 01:56 IST2016-02-08T01:56:01+5:302016-02-08T01:56:01+5:30

साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाही निवड पद्धत अवलंबावी, अशी सूचना ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी केली.

Need a representative selection method | प्रातिनिधिक निवड पद्धत हवी

प्रातिनिधिक निवड पद्धत हवी

पुणे : साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाही निवड पद्धत अवलंबावी, अशी सूचना ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका लेखकाचा आणि प्रकाशकाचा विशेष सन्मान करण्यात येतो. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या संमेलनात प्रकाशक लेखक डॉ. के. रं. शिरवाडकर सन्मान करण्यात येणार होता. मात्र वयोमानामुळे डॉ. शिरवाडकर सन्मान स्वीकारण्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे रविवारी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला.
महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, कवी अरुण शेवते, प्रकाशक दिलीप माजगावकर उपस्थित होते.
डॉ. शिरवाडकर म्हणाले, ‘मराठी भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी दर्जेदार मराठी-इंग्रजी शब्दकोषाची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात अशोक केळकर यांनी सुरू केलेले कार्य पूर्णत्वास न्यावे.’
आयुष्यात संतांना भेटण्याचा जो आनंद मिळतो, तो आनंद शिरवाडकरांना भेटताना झाला. समीक्षक म्हणून त्यांनी मराठी भाषेची मौल्यवान सेवा केली आहे, असे मत स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माजगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Need a representative selection method