शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कृषीसंशोधनात राजकीय इच्छाशक्तीची गरज  : डॉ.एम.एस.स्वामीनाथन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 20:13 IST

कृषीबाजारपेठेतील शेतक-याचे महत्व वाढण्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी.

ठळक मुद्देनुसतेच प्रयोग नकोत, ’’ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर’’ विषयावर मार्गदर्शन कृषीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रयोग होत असून शेतक-यांना त्याचा फायदा

पुणे : महत प्रयासानंतर आपण हरितक्रांतीपर्यत पोहचलो. वाटेतील अडचणींचा सामना करत शेती आणि शेतकरी यांना फायदेशीर काय आहे, हा विचार जास्त महत्वाचा आहे. आता सातत्याने कृषीक्षेत्रात प्रयोग होत आहेत. या प्रयोगाच्या निष्कर्षांपर्यंत पोहचल्यावर त्याच्या अंमलबजावणी करण्याकरिता राजकीय इच्छाशक्तीची देखील गरज आहे. असे ख्यातनाम कृषीतज्ञ -संशोधक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.  कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशातील शेतीसमोर असणा-या विविध आव्हानांचा आढावा घेतला.  ते म्हणाले, देशातल्या कृषीव्यवस्थेचे चित्र बदलायचे असल्यास त्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज आहे.  बदलते हवामान, दुष्काळाची भीती, पुरसदृश परिस्थिती आणि बाजारपेठ व्यवस्थापन आदी गोष्टींचे आव्हान शेतक-यांपुढे असून त्यांनी सातत्याने याबाबत विचार करणे महत्वाचे आहे. केवळ आकर्षक कृषीयोजना असणे फारसे उपयोगाचे नाही. कृषीबाजारपेठेतील शेतक-याचे महत्व वाढण्यासाठी आवश्यक ते बदल स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी. कृषीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रयोग होत असून त्याचा फायदा देखील शेतक-यांना होतो आहे. मात्र, तितकेच पुरेसे नसून त्या प्रयोगांची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. आपला प्रवास ग्रीन टू इव्हरग्रीन रिव्हॉल्युशन असा सुरु असून सध्या आपण जेनिटीक मॉडिफिकेशनच्या उंंबरठ्यावर आहोत.* आकडेवारी, समर्पक उदाहारणे डॉ.स्वामीनाथन यांनी अतिशय अभ्यासुपणाने आपले विचार व्यक्त करताना ते पटवून देण्यासाठी विविध संदर्भग्रंथ, संकेतस्थळे, स्थळ सर्वेक्षण अहवालांचा दाखला दिला. वयाची ९२वर्षे पूर्ण करणा-या डॉ. स्वामीनाथन यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सभागृहात शांतता होती. देशाविदेशातील शास्त्रज्ञ, त्यांचे प्रबंध, संशोधन, कार्य, याविषयीची माहिती, जगभरात शेतीविषयक चाललेले संशोधन, नीती आयोग, आयोगाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली आकडेवारी, देशांमधील वेगवेगळ्या राज्यांमधील सद्यस्थितील शेतीची परिस्थिती याचे सादरीकरण डॉ. स्वामीनाथन यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रPoliticsराजकारण