वृक्षारोपण काळाची गरज: थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:38+5:302021-06-09T04:13:38+5:30
वृक्षरोपण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले. दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एम.सी.एल सीएनजी कंपनीचे ...

वृक्षारोपण काळाची गरज: थोरात
वृक्षरोपण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले. दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एम.सी.एल सीएनजी कंपनीचे सभासद व्हावे. भविष्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून तालुका इंधनमुक्त होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता. दौंड) येथे
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एमसीएल सीएनजी गॅस, दौंड तालुक्यातील धन अशोका कंपनी व पारगाव ग्रामस्थ यांच्या वतीने तलाठी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्या वेळी थोरात बोलत होते. या वेळी उपसभापती सयाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे ,नानासाहेब जेधे, तलाठी सुभाष वेताळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास सुभाष बोत्रे ,संतोष ताकवणे, नामदेव काळे ,संभाजी ताकवणे ,चांद मन्यार, दत्तू ताकवणे ,डॉक्टर माऊली बोत्रे, विश्वास ताकवणे ,स्वप्निल खांदवे, विजय ताकवणे ,दशरथ बोत्रे, रामकृष्ण ताकवणे ,सुरेश ताकवणे उपस्थित होते. दौंड तालुक्यातील चार गावांमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम एम.सी.एल कंपनी व धन अशोका या कंपनीचे अशोक गिरमकर आदेशानुसार कार्यक्रम घेण्यात आला.
०७ केडगाव
पारगाव येथे वृक्षारोपण करताना रमेश थोरात,सयाजी ताकवणे, पोपट ताकवणे व मान्यवर.