चांगल्या विचारांची समाजाला गरज
By Admin | Updated: September 3, 2014 00:34 IST2014-09-03T00:34:20+5:302014-09-03T00:34:20+5:30
चांगला विचारच समाजाला सशक्त बनवितो आणि त्यासाठीच वाचनालयांची गरज आहे

चांगल्या विचारांची समाजाला गरज
राजगुरुनगर : चांगला विचारच समाजाला सशक्त बनवितो आणि त्यासाठीच वाचनालयांची गरज आहे, असे प्रतिपादन पुणो जिल्हा नियोजन आणि विकास समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी येथे केले. राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयास 2 लाख लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अभ्यासिका सुरु करण्यात आली, तिचे उद्घाटन मेदगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य किरण आहेर, राजगुरुनगरचे उपसरपंच रेवण थिगळे, सदस्य सुरेश कौदरे, पुणो जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपानराव पवार, गिरीश चावरे, वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार, संचालक बी एम सांडभोर, वासंती बेलसरे, बाळासाहेब बकरे, माणिकराव पाटोळे, वाचनालयाच्या ग्रंथपाल सुप्रिया तपस्वी, वैभव नाईकरे, वसंतराव मेहंदळे,सायली भालेराव, महेश देशमुख, राजेंद्र राशिनकर, कल्पना वाव्हळ,ज्योती नेमुरी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिव राजेंद्र सुतार यांनी केले. यावेळी बी एम सांडभोर आणि माणिक पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सोपानराव पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
आमच्या पिढीला ज्या अडचणी आल्या त्या, ग्रामीण भागातील मुलांना येऊ नयेत त्यासाठी अशा अभ्यासिकेची गरज होती. ग्रामीण मुलांचा टक्का स्पर्धा परीक्षांमध्ये आणि इतरही क्षेत्रत वाढवा या हेतूने जिल्हा नियोजन मंडळातून 2 लाखांचा निधी दिला आहे. समाजकारण करण्याचे संस्कार घरातूनच आणि तेही विद्यार्थिदशेत मिळाले तर त्याचा उपयोग भविष्यात चांगला समाज घडविण्यासाठी होतो.
- दिलीप मेदगे, सदस्य जिल्हा नियोजन विकास समिती