शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारांची ‘केस’ लढण्याची गरज डॉ. रझिया पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 12:18 IST

ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे.

ठळक मुद्दे ‘ओह माय गोडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सध्याचे सरकार हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर संघाचे आहे. एकीकडे देश-विदेशात गांधींबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे देशामधून हळूहळू गांधी संपवायचे असे प्रकार सुरू आहेत. आता आणीबाणीची वेळ आली आहे. गांधींच्या खुनाची केस घेऊन लढायचे की विचारांची? ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे. गांधी विचारांची केस लढण्याची गरज आहे, असे परखड विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने विनायक होगाडे  लिखित ‘ओह माय गोडसे’ या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध कायदे अभ्यासक असीम सरोदे, प्रकाशक मनोहर सोनावणे आणि लेखक विनायक होगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष वारे यांनी भूषविले. गांधींबद्दल कपोलकल्पित कथा सांगितल्या जात असून, गोबेल्स नीती म्हणजे त्यांच्याबद्दलच्या खोट्या गोष्टी कशा खºया आहेत हे जनतेच्या मनावर वारंवार बिंबवून त्यांना सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून रझिया पटेल म्हणाल्या, हिंदुतत्ववाद्यांना सामाजिक न्याय, समता, एकात्मकता, धर्मनिरपेक्षता, यावर काम करणारेी लोक शत्रू वाटत असून, त्यांना संपविले जात आहे. नथुराम जरी संपला असला तरी त्यामागची प्रवृत्ती संपलेली नाही. पालकांना आपण कशाच्या बदल्यात काय देतोय हे कळलं नाही तर नथुराम तयार होत राहातील.  लेखक विनायक  होगाडे आणि सुभाष वारे यांनीही मनोगत व्यक्त केले...........गांधी आपल्या काळातील  मोठं वास्तव आहे. गांधी आणि आंबेडकर यांचा हात सोडल्यामुळे गांधी अनाथ झाल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे भाजप गांधी हायजॅक करत आहेत. वृत्तवाहिन्यांनी महात्मा गांधी नायक की खलनायक हा कार्यक्रम करावा. जेवढे ते खलनायक सांगितले जातील. तेवढे ते नायक म्हणून पुढं येतील. गांधी कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. गांधी विचार टाकून दिला तर अस्मितेच्या आधारे हिंसाचाराची स्थिती उदभवू शकते. त्यामुळे आता राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी संतस्वरूपात नव्हे तर क्रांतिकारी रूपात पुढे आणण्याची गरज आहे.  - अँड असीम सरोदे ........

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसे