शेती व शेतकऱ्याचा विकास गरजेचा

By Admin | Updated: March 22, 2015 00:51 IST2015-03-22T00:51:43+5:302015-03-22T00:51:43+5:30

शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

Need for farming and farming | शेती व शेतकऱ्याचा विकास गरजेचा

शेती व शेतकऱ्याचा विकास गरजेचा

पुणे : शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक भान निर्माण झाले पाहिजे. सर्वांगीण विकासाचा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
बाळवृंद फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल डॉ. राजा व रेणू दांडेकर या दांपत्याचा बापट यांच्या हस्ते सार्थक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी परदेशी व मुकुंद परदेशी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना रेणू दांडेकर म्हणाल्या, ‘‘खेड्यातून पुणे मुंबईसारख्या शहरांकडे जाणारा लोंढा कमी करण्यासाठी स्वत:च्या गावाच्या विकास करण्याची इच्छा आणि विचार रूजवण्याचे उद्दिष्ट ठरवून काम केले.
राजा दांडेकर म्हणाले, ‘‘शाळेतील मुले ही चमकणारे काजवे असतात. मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य दिशा देणे हे शिक्षक, पालक आणि कुटुंबाचे काम असते. शाळा महाविद्यालयातून बाहेरच्या जगात आपण जे शिकतो तेच खरे शिक्षण असते आणि तोच खरा शिक्षण घेतल्याचा आनंद असतो.’’(प्रतिनिधी)

Web Title: Need for farming and farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.