खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज : कुतवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:26+5:302021-09-06T04:14:26+5:30

पुण्यातील अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन काटे पुरम चौक सांगवी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त करण्यात आले होते. क्रीडा ...

The need to encourage players: Curiosity | खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज : कुतवळ

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज : कुतवळ

पुण्यातील अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन काटे पुरम चौक सांगवी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील धनंजय मदने यांना अद्वैत चषक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बापुसाहेब कुतवळ बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, राष्ट्रीय खेळाडू कैलास गायकवाड, राजेंद्र शिरोळे, संजय कांबळे, उद्धव पवार यांना अद्वैत चषक पुरस्कार - २०२१ देण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष साई स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचे फिरोज खान, अद्वैत क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन कोठुळे, संस्थेचे सचिव युवराज दिसले, उद्योजक अच्युत शर्मा मान्यवर उपस्थित होते.

बापूसाहेब कुतवळ म्हणाले, नीरज चोप्रा सारखा प्रतिभावंत खेळाडू हासुद्धा पुण्यातच शिकण्यासाठी होता. प्रत्येक खेळाडूला मदत करून खेळाबद्दल प्रोत्साहन देऊन शासनाने पुढाकार घ्यावा तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने हे पुणे जिल्ह्यासह शहरात अनेक प्रशिक्षण देत असून त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

सूत्रसंचालन युवराज दिसले यांनी केले तर आभार आभार हेमंत बारमुख यांनी केले.

०५ उरुळी कांचन

धनंजय मदने यांना अद्वैत चषक पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

Web Title: The need to encourage players: Curiosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.