शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरज : शि.द फडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:42 IST

सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे.

ठळक मुद्देपाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी संवाद

गतकालीन/ समकालीन व्यक्ती, घटना किंवा प्रसंग यात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या सूचित अर्थांचे मार्मिक आविष्कारातून रंजन करण्याची हातोटी व्यगंचित्रकारांकडे असते. कोरोना काळातही आपल्या अर्थपूर्ण व्यंगचित्रांद्वारे रसिकांच्या ओठावर हास्य फुलविण्याची जबाबदारी व्यंगचित्रकार पार पाडत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने गेल्या पाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी 'लोकमत' ने संवाद साधला. सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे, असे मत त्यांनी नोंदविले.--------------------------------------------------------------------------------------------नम्रता फडणीस* एक काळ असा होता की वृत्तपत्र, मासिकांमध्ये व्यंगचित्रांना प्रामुख्याने स्थान होते. मात्र आज माध्यमांमधून व्यगंचित्र काहीशी हद्द पार झाली आहेत. या स्थितीकडे तुम्ही कसे पाहाता?- वृत्तपत्र किंवा इतर तत्सम माध्यमांमध्ये व्यंगचित्रांना स्थान उरलेले नाही. यात काही अंशी तथ्य असलं तरी नवीन माध्यमं समोर येत आहेत.संमेलनांमध्ये व्यंगचित्र प्रदर्शनं किंवा मेळाव्यांना नव्या पिढीचाउत्तम प्रतिसाद मिळतोय. आता अभिव्यक्तीच माध्यमही बदललयं. सोशल मीडियावरव्यंगचित्रकार मोठ्या प्रमाणावर व्यंगचित्रं प्रसिद्ध करीत आहेत.* या नव्या माध्यमाबददलचं तुमचं निरीक्षण काय?-जी माध्यमं जन्माला येतात. ती स्वत:च स्थान घेऊन येतात. त्याचही स्वागत करायला हवं. पण ते कशा पद्धतीने स्वीकारल पाहिजे हे शेवटीमाध्यमकतर््यांच्या हातात आहे. हे माध्यम मुक्त असल्याने काही अनिष्टगोष्टी येऊ शकतात. ज्या तुम्हाला थांबवता येऊ शकत नाही. वृत्तपत्रामध्येकसे तुम्हाला जबाबदार धरता येऊ शकते. नव्या पिढीने या माध्यमाचाजबाबदारीने उपयोग केला पाहिजे.* नव्या युगात व्यंगचित्राची भाषा बदलली आहे का?-पूर्वीच्या काळी मी व्यक्तिश: व्यंगचित्रांसाठी शब्दांचा वापर खूप कमी करीत असे. मात्र  वर्तमान काळात शब्द माध्यमातूनही व्यंगचित्रं रेखाटली जात आहेत. दोन्हीचेही स्वागत करायला पाहिजे. परंतु एक आहे की शब्दविरहित व्यंगचित्र असतं तेव्हा त्याचा कँनव्हासही खूप मोठा असतो. प्रादेशिक भाषांमधले देखील त्याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. म्हणूनच आजही आंध्र प्रदेश, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये छोट्या छोट्या मासिकांनी शब्दविरहित व्यंगचित्रांची परंपरा जपली आहे.* नवोदितांनी व्यगंचित्रे साकारताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?-व्यगंचित्रांची भाषा, त्याचे व्याकरण आत्मसात केले पाहिजे. मगचंकल्पनेला चित्ररूप द्यायला हकं. आपल्याला नक्की काय म्हणायचयं याचा अर्थबोध समोरच्याला समजला पाहिजे. जे शब्दातून व्यक्त होत नाही ते प्रभावीपणेचित्रांमधून मांडता आले पाहिजे. त्यासाठी सामाजिक घडामोडींचे निरीक्षणउत्तमप्रकारे करता आलं पाहिजे.* सध्याचे देशातील वातावरण व्यगंचित्रकारांसाठी पोषक आहे का? व्यंगचित्रकारांपुढची आव्हाने काय वाटतात?-पंडित नेहरूंच्या काळात व्यंगचित्रकार शंकर यांची चित्रे अत्यंत तिखट असायची. त्यावर निषेध नोंदविले गेले. नाराजीही व्यक्त झाली. मात्र तेकुणी बंद केले नाही. मात्र सध्याचा काळ असा नाही. कुणाच्या तरी लगेचभावना दुखावल्या जातात. निकोप दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे. त्यासाठीचित्र साक्षरता निर्माण व्हायला हवी. केवळ व्यंगचित्र म्हणजे राजकीय असंनाहीये. करमणूक, शैक्षणिक, विचारप्रवाहासाठी म्हणून देखील व्यंगचित्र हेमाध्यमं उपयुक्त आहे. ते जतन केले पाहिजे.----------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCartoonistव्यंगचित्रकार