शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:08 IST

प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास सुरुवात होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.‘ती’ची अस्मिता टिकवण्याच्या, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. समाजाची जडणघडण करण्यामध्ये ‘लोकमत’ने पुढचे पाऊल टाकले आहे. गणपती कोणी बसवला, आरती कोणी केली, गणेश मंडळांमध्ये किती महिला पदाधिकारी आहेत, या बाबी महत्त्वाच्या आहेतच; मात्र, याबरोबरच मंडळात जे पदाधिकारी आहेत किंवा गणपती पाहण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्या मनात महिलांबद्दल किती आदराची भावना आहे, यावरही महिलांची सुरक्षितता अवलंबून आहे. गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असायलाच हवा. जेणेकरून, मंडळाच्या कार्यपद्धतींमध्ये आखीव-रेखीवपणा येऊ शकतो. मंडळांची विशिष्ट आचारसंहिता तयार होऊन तिचे पालन केले जाईल. जिथे महिला आहेत, तिथे शिस्तप्रियता आहे, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये, विशेषत: गणेश मंडळांमध्ये महिलांचा समावेश, सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून अवैध गोष्टींना आळा बसू शकतो. शिस्त आल्यामुळे गणेशोत्सवाचे रूप पालटण्यासही मदत होऊ शकते.दहा दिवसांमध्ये शहरात गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी असते. यामध्ये महिला, तरुणींचाही समावेश असतो. बरेचदा, महिलांना छेडछाड, शेरेबाजी अशा घटनांना सामोरे जावे लागते आणि मनात भीती उत्पन्न होते. महिला, तरुणींना निर्भयपणे गणपती पाहण्यासाठी येता यावे, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. आपल्याही घरामध्ये आई, पत्नी, बहीण, मुलगी असते, त्याप्रमाणे गणपती पाहायला येणाºया महिलाही कोणाची तरी बहीण, मुलगी असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे, अशा स्वरूपाची मानसिकता प्रत्येक पुरुषामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.शाळकरी मुलगी असो महिला अथवा वृद्ध स्त्री, आजकाल समाजात कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाही. तिने कोणती चूक केली, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला? यामध्ये मुलींची कोणत्याही प्रकारची चूक नसून, पुरुषांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार बिंबवण्याची सुरुवात घरापासूनच होते. यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जडणघडणाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. घरामध्ये मुलगा आणि मुलीवर समान संस्कार करण्याची गरज आहे. मुलीची जडणघडण करताना ‘तू घाबरू नकोस, निर्भयपणे जग, कोणताही न्यूनगंड बाळगू नकोस, तू मुलापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाहीस’, हा एक संस्कारांचा भाग आहे. समाजाची कल्पना देतानाच तुझ्यावर काही आघात झाल्यास तू त्याचा कशा प्रकारे सामना केला पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने ठाम राहशील, अशी प्रवृत्ती मुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास किमान सुरुवात होऊ शकते. पालकांनी केवळ आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळू शकेल. पुरुषांची मानसिकता बदलल्यास अत्याचारांचे प्रमाण रोखता येईल आणि ‘ती’च्या दृष्टीने प्रत्येक दिवस उत्सवी आणि सुरक्षित होईल.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणे