भोर-कापूरहोळ रस्त्यालगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:49+5:302021-01-08T04:29:49+5:30
या रस्त्यालगत दोन्ही बाजूने पाच ते सहा फूट गवत माजले ...

भोर-कापूरहोळ रस्त्यालगत
या रस्त्यालगत दोन्ही बाजूने पाच ते सहा फूट गवत माजले आहे. काही ठिकाणी डांबरीकरणालगत अर्ध्या फुटावर गवताने रौद्ररूप धारण केले आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वळणे आहेत. गवत उंच वाढले असल्याने वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संतापाची भावना व्यक्त होत आहे.
--
०६भोरो कापूरहोळ
सोबत फोटो - भोर-कापूरहोळ रस्त्यालगत उंच वाढलेले गवत.