एनडीआरएफकडून बेपत्ता तरुणाचा शोध

By Admin | Updated: January 9, 2017 03:05 IST2017-01-09T03:05:02+5:302017-01-09T03:05:02+5:30

तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार कौस्तुभ कैलास घारे (वय ३० , रा.वराळे ता.मावळ) हा शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता

NDRF searches for missing youth | एनडीआरएफकडून बेपत्ता तरुणाचा शोध

एनडीआरएफकडून बेपत्ता तरुणाचा शोध

तळेगाव दाभाडे : तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार कौस्तुभ कैलास घारे (वय ३० , रा.वराळे ता.मावळ) हा शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात
आली आहे.
बेपत्ता घारे यांची दुचाकी (एमएच १४ एफक्यू ९०९४) येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला धडकलेल्या स्थितीत आढळली. नदीपात्रात हेल्मेट मिळून आले आहे. त्यामुळे रविवारी दुपार नंतर एनडीआरफच्या दोन तुकड्यातील पंधरा जवान, दोन बोटींसह टीमलीडर भैरवनाथन यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिमेत सहभागी झाले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंद्रायणी नदीपात्रात काहीच सुगावा न लागल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पासलकर, अरविंद हिंगोले, मुगुटराव पाटील व पोलीस कर्मचारी यांनी मदत
केली. इंद्रायणी नदीपात्रात एनडीआरफच्या जवानांना गंज लागलेल्या अवस्थेतील एक स्टेनगन सापडली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तळेगाव पोलीस ठाण्यातील हवालदाराकडील गहाळ झालेली ही स्टेनगन असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. इतर सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)

Web Title: NDRF searches for missing youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.