शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन 2.5 किमी धावला NDA जवान, लष्कराच्या अधिका-यांनीही ठोकला सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:51 IST

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी जवानाने दाखवलेल्या शौर्यामुळे लष्कराच्या अधिका-यांनीही त्याला सॅल्यूट ठोकला आहे

पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी जवानाने दाखवलेल्या शौर्यामुळे लष्कराच्या अधिका-यांनीही त्याला सॅल्यूट ठोकला आहे. शर्यतीत विजय किंवा पराभवाची चिंता न करता जखमी साथीदाराला मदत करणं आपलं पहिलं कर्तव्य असल्याचं या जवानाने दाखवून दिलं. आपल्या जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन त्याने जवळपास अडीच किमीपर्यंत धाव घेतली. जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊनच त्याने शर्यत पूर्ण केली. जखमी झाल्याने आपला साथादीर शर्यतीत मागे राहू नये ही भावना त्यामागे होती. जवानाने केलेली ही कामगिरी पाहून इतर जवानांकडून त्याचं कौतुक होत आहे. जवानाच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याचा विशेष सत्कारही करण्यात आला आहे. या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचंही कौतुक केलं जात असून इथे फक्त शूर नाही तर माणुसकी जपणारे जवानही तयार होतात ज्यांच्यात त्याग, सहकार्याच्या भावना निर्माण होतात असं म्हटलं जात आहे. 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीकडून दर सहा महिन्याला क्रॉस कंट्री रेस आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 12 किमी अंतर पार करायचं असतं. या स्पर्धेत पहिल्या टर्ममधील जवान सोडून इतर सर्वांनी सहभाग घेणं अनिवार्य असतं. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेदरम्यान सहाव्या आणि अंतिम टर्मचा जवान चिराग अरोरा याने आपला साथीदार जेवेश जोशी जखमी असल्याचं पाहिलं. जेवेश जोशी पुढे धावू शकत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. यावेळी इतर कोणी असतं तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या धावण्यावर लक्ष केंद्रित केलं असतं. पण चिरागने तसं केलं नाही. चिरागने शौर्य आणि माणुसकी दाखवत जेवेश जोशीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि धावण्यास सुरुवात केली. अडीच किमी अंतर पार केल्यानंतर दोघांनी एकत्र शर्यत पूर्ण केली. 

चिराग जेवेशला आपल्या खांद्यावर घेऊन धावत असल्याचं पाहून मैदानात उपस्थित असणा-यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. चिरागला शर्यत पूर्ण करण्यासाठी 55 मिनिटं लागली. आपल्या साथीदाराने शर्यत पूर्ण न केल्याने त्याचा स्कोअर कमी होऊ नये यासाठी चिरागने प्रयत्न केल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे. अकॅडमीकडून इंटर स्क्वॉड्रन चॅम्पिअनशिप ट्रॉफी ठेवली जाते. अकॅडमीचा भाग झाल्यानंतर प्रत्येक जवानाला 18 पैकी एक स्क्वॉड्रन दिलं जातं. प्रत्येक स्क्वॉड्रनसाठी ही करा किंवा मरा रेस असते. मेजर सुरेंद्र पुनिया यांनी जवानांचा फोटो ट्विट करत सोल्जर स्पिरीट असल्याचं म्हटलं आहे, सोबतच शूर जवानाचा सन्मान करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :nda puneएनडीए पुणे