खोर ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य संख्या पैकी ८ सदस्य संख्या आमदार राहुल कुल गटाचे तर माजी आमदार रमेश थोरात गटाचे ३ सदस्य हे निवडून आले होते. यावेळी खोर ग्रामपंचायतवर राहुल कुल गटाचा झेंडा हा प्रस्थापित झाला होता. मात्र खोरला सरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण जाहीर झाले. परंतु आमदार राहुल कुल गटाकडे आरक्षित झालेले अनुसूचित जातीतील महिला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आरक्षण निघालेल्या अनुसूचित जातीतील महिला या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या असल्याने खोर ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीकडून वैशाली संदीप अडसुळ या बिनविरोध सरपंच निवडून आल्या आहेत. दौंड तालुक्यातील जवळपास अनेक ग्रामपंचायतवर हे आरक्षण बाबतीतील खेळ पाहावयास मिळाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत वर आमदार राहुल कुल गटाचे वर्चस्व आहे. मात्र सरपंचपद हे आरक्षणानुसार अनेक ग्रामपंचायतीचे वर्चस्व हे राष्ट्रवादीच्या ताब्यात गेले आहे. खोर ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल गटाचे ८ सदस्य निवडून येवू सुद्धा केवळ आरक्षणामुळे खोर ग्रामपंचायतवर माजी आमदार रमेश थोरात गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र चौधरी हे किंगमेकर ठरले गेले आहेत.
वैशाली अडसुळ