शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी युवती सेलने केला एफआयआर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' असे या पेजचे नावराष्ट्रवादीच्या नेत्यांच्या छायाचित्रांवर अन्य छायाचित्रे टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हे फेसबूक पेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आहे. सातत्याने त्यावर असा मजकूर प्रसिद्ध होत असल्याने ही तक्रार करण्यात आली.राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी ही माहिती दिली. 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' असे या पेजचे नाव आहे. या नावाला साजेसा असा मजकूर त्यावर मुळीच येत नाही, मात्र अशा प्रकारच्या मजकूरामुळेच त्या पेजला असंख्य फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातेही आहे. तरीही ते याची दखल घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे फिर्याद करून त्यांच्या लक्षात ही बाब आणून देत आहे असे भिलारे यांनी सांगितले. मजकूराबरोबरच पेजवर अत्यंत घाणेरडी छायाचित्रेही असतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या छायाचित्रांवर अन्य छायाचित्रे टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच भारतीय दंड संहिता १८६० या अधिनियमाअंतर्गत कलम ५०९ व ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याअंतर्गत कलम ६६(उ) व कलम ६७ अन्वये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यासाठी ही फिर्याद दाखल केली आहे असे भिलारे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र केशवराव मोकाशी यांनी फिर्याद स्वीकारून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील तपास निरीक्षक संभाजी रामचंद्र यांच्याकडे सोपवला. पोलिसांकडून याची योग्य दखल घेऊन तपास केला जाईल व दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास भिलारे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेFacebookफेसबुक