राष्ट्रवादीच्या माजी आमदारांमध्ये बाचाबाची
By Admin | Updated: January 21, 2015 23:07 IST2015-01-21T23:07:05+5:302015-01-21T23:07:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली़ दोन माजी आमदारांमधील ही चकमकच चर्चेचा विषय ठरली़

राष्ट्रवादीच्या माजी आमदारांमध्ये बाचाबाची
रांजणगाव गणपती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली़ दोन माजी आमदारांमधील ही चकमकच चर्चेचा विषय ठरली़
शिरुर हवेली मतदार संघातील पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची कारणमिमांसा करताना पोपटराव गावडे यांनी सांगितले, की जानकर फॅक्टरमुळे पराभव झाला असता तर आंबेगावमध्ये हा फॅक्टर का नाही?़ प्रचाराचे नियोजन चांगले नव्हते़ मतदारसंघात आपल्याला प्रचाराला बोलवले नाही़
नियोजनबद्ध प्रचार केला असता तर चित्र वेगळे दिसले असते़ त्यांच्या या मुद्द्याला अशोक पवार यांनी आक्षेप घेतला़ त्यावरुन दोन्ही माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली़
जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरु होता़ शेवटी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, जालिंदर कामठे, बाळासाहेब नरके यांनी हस्तक्षेप करुन दोघांमधील ही बाचाबाची थांबविली़
या वेळी सूर्यकांत पलांडे यांनी आताचे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांनी फकत अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. तर अशोक पवार यांनी मागचे झाले गेले विसरुन जाऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरदराव पवार,अजितदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या व पक्षाच्या विचारांची बांधिलकी मानून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे आगामी सर्व निवडणुका पक्षाच्या नावाने व साहेबांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असून कोणीही आत बाहेर करु नये असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
यावेळी बाळासाहेब नरके,मंगलदास बांदल,राजेंद्र कोरेकर, डॉ.वर्षा शिवले यासंह अनेकांनी पक्षाच्या मेळाव्यात आपले विचार मांडले तर काहींनी विचार मांडतांना एकमेकांची उनीधुनी काढण्याची संधी सोडली नाही.दोन माजी आमदारमध्ये झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली तर या बाबत बाळासाहेब नरके यांनी हा पक्षांर्गत विषय असून तो पक्षीय पातळीवर तो संपविला आहे असे सांगितले.
या वेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अॅड.अशोक पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल,पीडीसीसी बँकेचे संचालक निवृत्तीआण्णा गवारे, भिमाशंकर सा. कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेपाटील, जिल्हा युवक अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष संतोष रणदिवे, महिलाध्यक्षा
डॉ. वर्षा शिवले, पंचायत समिती सभापती सिध्दार्थ कदम, बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर, जि.प.सदस्य
नंदकुमार पिग्ांळे, मनिषा कोरेकर, पांडुरंग थोरात, अॅड रंगनाथ थोरात तसेच आजी माजी पदाधिकारी, जि.प.सदस्य, प. स.सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)