शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

खेड पंचायत समितीच्या सभापतिपती राष्ट्रवादीचे अरुण चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झालेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर : अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झालेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण संभाजी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सभागृहात शिवसेनेचे बहुमत आहे. पक्षाचे माजी सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

खेड पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. १०१ दिवस पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर होते. अविश्वास ठराव मंजुरी व त्या दरम्यान झालेल्या अनेक राजकीय घडामोडी, न्यायालयीन दखल यामुळे हा अविश्वास ठराव गाजला. सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात यावरून गेले तीन महिने राजकीय कलगीतुरा रंगला होता. सभापती भगवान पोखरकर हे कारागृहात असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये ते निवड सभेला उपस्थित होते. त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्या वरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोखरकर यांचा अर्ज अवैध ठरविला. नवनिर्वाचित सभापती चौधरी यांना शिवसेनेच्या बंडखोर ५ सदस्य तसेच भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा पाठिंबा होता. शिवसेनेच्या या ५ बंडखोर सदस्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोखरकर यांना मतदान करण्यासाठी आदेश दिला होता. मात्र, बिनविरोध निवड झाल्याने या आदेशाचा उपयोग झाला नाही. यापूर्वी अविश्वास ठराव संमत होताना असाच आदेश देण्यात आला होता. मात्र पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या या सदस्यांनी जुमानले नव्हते. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अरुण चौधरी यांनी सभागृहात येऊन अर्ज दाखल केला. त्यांना वैशाली गव्हाणे यांनी सोबत येऊन सुचक म्हणून स्वाक्षरी केली. काही वेळाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भगवान पोखरकर यांचे पिंजरा गाडीत आगमन झाले. काँग्रेसचे माजी उपसभापती अमोल पवार, सेनेचे ज्योती अरगडे, मचिंद्र गावडे तत्पूर्वी सभागृहात दाखल झाले होते. आरगडे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली. दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र, नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. नागरिकांचा मागास प्रवर्ग जात प्रमाणपत्र पडताळणी नसल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची निवड होताच आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. वाडा रोड व पंचायत समिती परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, निरीक्षक सतीश गुरव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

...............................................................

अल्पमतात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करून पदाची रणनीती मोहिते पाटील यांना जमली आणि त्यांच्या पुढे शिवसेना पुरती नमली असे मानले जात आहे. खेड पंचायत समितीत शिवसेना व मित्रपक्ष मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून माजी सभापती भगवान पोखरकर यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह धरला होता. यावरून सेनेच्या ६ सदस्यांनी बंडखोरी केली. नंतर एक सदस्य स्वगृही परतले. ५ सदस्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. हे सदस्य राजकीय सहलीला असताना त्यातील काहींना परत आणण्याचा प्रयत्न करताना त्या हॉटेलवर भगवान पोखरकर यांनी गोंधळ घातला. त्यावरून त्यांच्या सह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोखरकरसह काही जण अद्याप तुरुंगात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. महाआघाडी सरकारच्या दोन पक्षाच्या नेतृत्व लढाईत आमदार मोहिते यांच्या माध्यमातून अखेर अजित पवारांची सरसी ठरली.