कोकणाच्या अत्यावश्यक मदतीसाठी राष्ट्रवादीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:44+5:302021-07-27T04:12:44+5:30
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार ( दि. २६ ) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप गारटकर बोलत ...

कोकणाच्या अत्यावश्यक मदतीसाठी राष्ट्रवादीचे आवाहन
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार ( दि. २६ ) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप गारटकर बोलत होते. गारटकर म्हणाले की, गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पावसाने कोकण परिसराला हैराण करून सोडले आहे. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरी, दापोली, महाड, गुहागर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील काही गावे तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यातील काही गावांना या भागातील नद्यांना महापूर आल्यामुळे या भागात पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी नागरिकांनी किराणा साहित्य, बिस्कीट, फरसाण, खाण्यायोग्य सुके पदार्थ नुडल्स, मॅगी, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, घर व दुकाने स्वच्छतेसाठी लागणारे स्वच्छता साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले.