राष्ट्रवादीची सर्व जागा लढविण्यासाठी चाचपणी
By Admin | Updated: September 25, 2014 06:16 IST2014-09-25T06:16:14+5:302014-09-25T06:16:14+5:30
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही.

राष्ट्रवादीची सर्व जागा लढविण्यासाठी चाचपणी
पुणे : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे तीनच दिवस उरले आहेत. काँग्रेस आघाडी तुटल्यास ऐनवेळी पळापळ नको म्हणून राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड व शहरातील सर्व २१ मतदारसंघांतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींकडून तयारीचे संकेत दिले आहेत. शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत शहरातील आठही मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी करण्यात आली.
जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे व शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांनी सर्व मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी, इच्छुक व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली आहे. जिल्हा व पिंपरी-चिंचवड येथील १३ मतदारसंघांतील इच्छुकांच्या तयारीचा आढावा दोन दिवसांपूर्वी बालेवाडी येथे घेण्यात आला. त्यानंतर अॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालयात बुधवारी
सर्व नगरसेवक, पदाधिकारी
व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात
आला. (प्रतिनिधी)