शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

बारामतीत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच गुलाल; अजित पवारांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 15:11 IST

अजित पवार यांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले...

बारामती (पुणे) : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलने सर्व जागा जिंकत बाजार समितीवरील वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादीने होमपीचवर बाजार समितीची सत्ता एकहाती राखण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलने यापुर्वीच १ जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले. तर इतर १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले आहे. अजित पवार यांच्या रणनीतीसमोर विरोधक गारद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले होते. गेल्या महिन्याभरापासून  बाजार समितीची रणनीती आखण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली. यामध्ये अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच मैदानात राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभुमीवर भाजपने बाजार समितीच्या निवडणुकीत लढत देण्याची तयारी केली होती. एक जागा वगळता भाजपने सर्व जागांवर लढत दिली. तर खुद्द अजित पवार यांनी दोन सभा घेतल्या. त्यामुळे बाजार समितीच्या आखाड्यात चांगलीच रंगत आली होती.  

भाजपसह मित्रपक्षांनी मोट बांधली. मात्र, निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार भाजप मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ग्रामीण भागातील सर्व सहकारी संस्थांवर एक हाती वर्चस्व आहे. त्यामुळे मतदारांशी संबंधित संस्था, सहकारात पवार गटाचा दबदबा असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सलामीलाच निलेश भगवान लडकत यांच्या रुपाने  कृषि पतसंस्था इतर मागासवर्ग मतदारसंघातून १ जागा बिनविरोध निवडून आणली. १७ जागांसाठी राष्ट्रवादीच्या रयत पॅनल आणि भाजपच्या शेतकरी विकास  पॅनल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लढत झाली. यात सर्व जागांवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. बारामती कृषी उत्पन्न बाजर समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनल 

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-कृषी पतसंस्था: सर्वसाधारण मतदारसंघ-विनायक महादेव गावडे—११७८,सतीश सर्जेराव जगताप—११४३,रामचंद्र शामराव खलाटे—११५३,बापुराव दौलतराव कोकरे—११६६,दयाराम सदाशिव महाडीक—११४८,सुनील वसंतराव पवार—११३१,दत्तात्रय शंकरराव तावरे—१११६.कृषि पतसंस्था महिला प्रतिनिधी—शोभा विलास कदम—१२११,प्रतिभा दिलीप परकाळे—१२३३.कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त जाती व जमाती:शुभम प्रताप ठोंबरे—१२१०.कृषि पतसंस्था इतर मागासवर्गीय प्रतिनिधी—निलेश भगवान लडकत(बिनविरोध). ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ:विशाल महादेव भोंडवे—४३०,विश्वास तानाजी आटोळे—४२४.ग्रामपंचायत अनुसूचित जाती— जमाती: अरुण गणपत सकट—४५१.ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल—युवराज कै लास देवकाते—४३७.अनुज्ञप्तीधारक व आडते—संतोष पांडुरंग आटोळे—२०४,मिलींद अशोक सालपे—२२०.हमाल व तोलारी—नितीन शंकर सरक—१४१.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय अपेक्षेप्रमाणेच झाला आहे. या निकालाने पुन्हा विरोधकांना त्यांची जागा दाखवुन दिली आहे. आमचे नेते अजितदादा पवार यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी,व्यापाऱ्यांसह विकासाची भुमिका घेतली. त्याचा कृषि क्षेत्रासह व्यापाराला फायदा झाला. आज पुर्ण एकतर्फी निकाल देऊन मतदारांनी दादांनी केलेल्या कामाची पावती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच सक्षम पर्याय देऊ शकते, हे आजच्या निकालाने सिध्द झाले आहे.-जय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर अध्यक्ष)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती