...तर राष्ट्रवादीच ‘राष्ट्रवादीला’ संपवेल
By Admin | Updated: February 18, 2017 02:36 IST2017-02-18T02:36:11+5:302017-02-18T02:36:11+5:30
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विरोधक सूडाचे राजकारण केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक

...तर राष्ट्रवादीच ‘राष्ट्रवादीला’ संपवेल
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विरोधक सूडाचे राजकारण केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. त्यामुळे आपसातील मतभेद विसरून काम करा, राष्ट्रवादीला विरोधकांचे आव्हान नाही, पक्षांतर्गत नाराजीच राष्ट्रवादी कॉग्रेसला अडचणीची ठरू शकते. असे झाल्यास बारामतीत राष्ट्रवादीच राष्ट्रवादीला संपवेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाराजांना कानपिचक्या दिल्या.
अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा झाल्या. माळेगाव येथील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका करत पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना कानपिचक्या देऊन मतभेद विसरून पक्षाच्या कामाला लागावे, असे आवाहन केले. सांगवी येथील सभेत त्यांनी माणसे म्हातारी झाली की, काहीही बोलतात, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यावर केली. त्याचाच धागा पकडून त्यांनी माळेगांवच्या सभेत चांगले काम करून देखील माळेगांव कारखान्याची सत्ता विरोधकांकडे गेली. यापूर्वी देखील असा प्रकार झाला होता. त्यामुळे चांगली कामे करावीत का नाही, असा प्रश्न पडतो. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा विरोधक घेतात. त्यामुळे मतभेद विसरून कामाला लागावे, स्थानिक पातळीवरील नाराजी, मतभेद धोकादायक आहेत, असे ही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)