राष्ट्रवादीचे सचिन तावरे स्पष्ट करणार भूमिका
By Admin | Updated: September 5, 2014 01:00 IST2014-09-05T01:00:02+5:302014-09-05T01:00:02+5:30
युवा नेते सचिन तावरे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत पर्वती मतदार संघात निवडणुकीची तयारी केली आहे.

राष्ट्रवादीचे सचिन तावरे स्पष्ट करणार भूमिका
पुणो : युवा नेते सचिन तावरे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत पर्वती मतदार संघात निवडणुकीची तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर अपक्ष म्हणून लढणार की अन्य पक्षात प्रवेश करणार, याविषयी भूमिका ते कार्यकत्र्याच्या जाहीर मेळाव्यात उद्या (शुक्रवारी) स्पष्ट करणार आहेत.
शहर युवक अध्यक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये सलग दहा वर्षे संघटनात्मक बांधणीचे काम सचिन तावरे यांनी केले आहे. शहरातील युवक संघटन आणि जनसंपर्कामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांनी खेचून आणली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात पक्षाने त्यांना कोणतेही पद दिले नाही. तरीही युवक संघटन व सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते कार्यरत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतून ते पर्वतीसाठी दावेदार असल्याची चर्चा होती.
मात्र, गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीतील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. परंतु, सचिन तावरे यांनी पक्षाच्या मुलाखतीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पर्वती मतदार संघातील इतर पक्षाच्या वरिष्ठांनी तावरे यांना आवतण दिले आहे. त्या पाश्र्वभूमीवर युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यावर आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर ते स्वबळावर निवडणूक लढविणार की इतर पक्षाचा पर्याय स्वीकारणार, या विषयी उत्सुकता आहे.(प्रतिनिधी)