शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पाणीकपात केल्यास फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 02:37 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा : पुणेकरांचे हक्काचे पाणी

पुणे : शहराच्या पाणीकपातीबाबत पालकमंत्री व महापौर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्यातच ताळमेळ दिसत नाही. पुणेकरांना हक्काचे पाणी मिळायला हवे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी पाणीकपात करूनच दाखवावी, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिले आहे. पाणीकपात केल्यास पालकमंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशाराही तुपे यांनी दिला.

पाणीकपातीच्या मुद्यावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन केले. या आंदोलनापूर्वी शिवसेनेने आंदोलन करून पाणीकपातीला विरोध केला. आंदोलनात तुपे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या आंदोलनात शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, श्वेता चव्हाण, अविनाशसाळवे, प्रमोद नाना भानगिरे, पल्लवी जावळे आदी सहभागी झाले होते.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, ‘एकीकडे पाणीकपातीविरोधात शिवसेना आंदोलन करते, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे विजय शिवतारे या खात्याचे मंत्री आहेत. मंत्र्यांच्या दालनात बसून पाणीकपात रद्द करण्याची हिंमत शिवसेनेने दाखवावी.’पालकमंत्री गिरीश बापट पाणीकपात होणार नाही, असे सांगत आहेत, तर महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून पाणीकपात होणारच, असे सांगितले जाते. दोघांमध्ये ताळमेळ दिसत नाही. यामध्ये नेमके खोटे कोण बोलत आहे. त्यांना सत्ता राबविता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान देतो. त्यांनी पाणीकपात करूनच दाखवावी. त्यांना शहरात फिरू देणार नाही.- चेतन तुपे 

टॅग्स :Chetan Tupeचेतन तुपेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका