राष्ट्रवादीला भीती बंडखोरीची
By Admin | Updated: September 26, 2014 05:38 IST2014-09-26T05:38:25+5:302014-09-26T05:38:25+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका कार्यक्रमात इच्छुकांनी कामाला लागा

राष्ट्रवादीला भीती बंडखोरीची
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका कार्यक्रमात इच्छुकांनी कामाला लागा, अशा सूचना शहरातील तीन आणि मावळातील एक अशा चारही मतदार संघातील इच्छुाकांना दिल्या होत्या. त्यामुळे केलेली सूचना खरी ठरली. आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रवादीने चारही मतदार संघांवर केलेला दावा आज खरा ठरला. शहरातील तीन आमदार राष्ट्रवादीकडून लढतील, असे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. राष्ट्रवादीची स्बळाची इच्छा पूर्ण झाली असली तरी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे.
आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी संलग्न आणि विद्यमान आमदारांना जागा सोडण्याचे धोरण राष्ट्रवादीचे असल्याने भोसरीचे अपक्ष आमदार विलास लांडे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित असल्याचे बालेले जात असतानाच रात्री उशीरा जगताप आणि लांडे यांनी भाजपात प्रवेश केल्याचा एसएमएस व्हॉर्टअॅपवरून फिरला. आमदार लांडे कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता कायम होती.
उपमुख्यमंत्र्यांची स्वबळाची इच्छा पूर्ण झाली असली तरी अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे जगताप यांनी भाजपात प्रवेश केल्याने उमेदवाराचा शोध राष्ट्रवादीला घ्यावा लागणार आहे. चिंचवडमधून माजी महापौर संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांचे नाव पुढे येऊ येते. पिंपरीतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव पुढे येऊ शकते. भोसरीतून स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, राष्ट्रवादीच्या सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल,
माजी शहराध्यक्ष नाना लोंढे, नगरसेवक दत्ता साने यांचे नाव पुढे येऊ शकते. इच्छुकांची संख्या राष्ट्रवादीत अधिक असली तरी बंडखोरीचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. राष्ट्रवादीतील आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्याची मोठी डोकेदुखी या पक्षासमोर आहे.(प्रतिनिधी)