शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित : शरद पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:29 IST

राज्यात इतकी भीषण महापुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची शिवस्वराज्य यात्रा स्थगित केल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली. 

पुणे : राज्यात इतकी भीषण महापुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची शिवस्वराज्य यात्रा स्थगित केल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली. 

पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे, महापालिका गटनेता दिलीप बराटे उपस्थित होते.गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे मोठे स्वरूप समोर आल्यावर सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच संदर्भात पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही दुष्काळी भागातून जात होती. त्यात सध्या महापूर आलेल्या कोणत्याही भागाचा समावेश नाही. मात्र राज्यात आलेले संकट बघून आम्ही यात्रा स्थगित करत आहोत. सध्या कार्यकर्त्यांची ऊर्जा ही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लागणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. सध्या कोणत्याही विश्लेषणाची गरज नसून सांगली, कोल्हापूरच्या जनतेला मदत करण्याची गरज आहे. 

त्यांनी यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • पुराच्या तडाख्याने पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान सोसत आलेल्या सांगली, कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारने १०० टक्के कर्जमाफी द्यावी.  

 

  • एनडीआरएफ सारखी यंत्रणा राज्य सरकारने उभी करणे गरजेचे आहे.

 

  • 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे.

 

  • कोल्हापूर आणि सांगली हा राज्यासाठी महत्वाचा भाग आहे. इथून संपूर्ण राज्यात सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. 

 

  • या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पूराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे.

 

  • सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी. 
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारfloodपूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे