शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:51 IST

आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे...

मंचर (पुणे) : भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.

आंबेगाव तालुक्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाबद्दलही वाईट बोललो नाही. मात्र, आजकाल काही कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलतात ते कानावर येते. अशा कार्यकर्त्यांना वाईट नाही तर सौम्य भाषेत उत्तर द्या. माझ्यासाठी आमदारकी, मंत्रिपद, मानमरतब महत्त्वाचे नाही. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोहला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. बोगद्याचा आकार एवढा आहे की, पूर्ण क्षमतेने पाणी नेले तर धरण तीन महिन्यांत रिकामे होईल. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी चार तालुक्यांत १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. आपले पाणी शाबूत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

देवदत्त निकम यांच्यावर वळसे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतिपद सांभाळत असताना गावागावात जाऊन गट पाडणे, भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. पक्षाच्या नावाने कुंकू लावून फिरायचे व गावागावात आपल्याच पक्षाच्या लोकांत भांडणे लावून गट पाडायचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आपला एक उमेदवार पराभूत झाला. त्याचा दोष जनतेला नाही तर आपल्या पक्षातील काही लोकांनी आतून मदत केली आहे. पक्षात ज्याला राहायचे त्यांनी आनंदाने राहावे, ज्यांना नाही राहायचे त्यांनी आनंदाने जावे, असा इशारा त्यांनी दिला. आपण गाफील राहता कामा नये. जास्तीत जास्त संपर्क वाढवून प्रत्येकाने वाडी-वस्तीवर फिरावे. राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभरात राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजपत नाही तर एनडीए गठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतील, असे वाटते. असे सांगून त्यांच्या अडचणी दूर होतील तेव्हा पवार आपल्यासोबत येतील, असा आशावाद व्यक्त केला. राजकीय स्थित्यंतर होऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तालुक्याचा विकासरथ वेगाने पुढे जाईल. सकारात्मक विचार ठेवा, जे काही घडेल ते चांगले घडेल, असे जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, युवक अध्यक्ष अंकित जाधव, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, कैलासबुवा काळे, भगवान वाघ, सुभाष मोरमारे आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपसभापती सचिन पानसरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणे