शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राष्ट्रवादीत एका जागेसाठी रस्सीखेच

By admin | Updated: October 13, 2016 02:44 IST

शहरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दोन तीन सदस्यीय प्रभागांपैकी एक असलेल्या रामटेकडी-सय्यद या प्रभाग क्रमांक २४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग

हडपसर : शहरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दोन तीन सदस्यीय प्रभागांपैकी एक असलेल्या रामटेकडी-सय्यद या प्रभाग क्रमांक २४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग येत आहे. त्यामुळे तिथे मोठ्या चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या एका जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा विद्यमान नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे. महापालिकेची यंदाची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. महापालिकेसाठी आगामी सदस्यांची संख्या १६२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटची जुळवाजुळव करण्यासाठी दोन प्रभाग ३ सदस्यीय बनविण्यात आले. त्यापैकी एक असा रामटेकडी व सय्यदनगर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये वैदूवाडी, रामटेकडी या झोपडपट्टी भागांसह मध्यमवर्गीयांचा भाग समाविष्ट आहे. प्रभागाची लोकसंख्या ६३ हजार ३०४ इतकी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या हडपसर गावठाण-वैदूवाडी (क्र.४२, रामटेकडी-वानवडी (क्र.४६), सय्यद नगर (क्रमांक ४५) या तीन प्रभागांचा बहुतेक भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आनंद अलकुंटे, फारूक इनामदार, विजया कापरे, कॉँग्रेसचे सतीश लोंढे, कविता शिवरकर, विजया वाडकर यांचा समावेश आहे. खुल्या प्रभागासाठी एकच जागा असताना येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आनंद अलकुंटे व फारूक इनामदार लढण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून इम्तियाज शेख, राम कसबे, श्याम ससाणे, उत्तम आढाव, असिफ मणियार यांच्या नावांची या प्रभागासाठी चर्चा आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाचे (ओबीसी) जातप्रमाणपत्र असल्याने काही जण महिलेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी आग्रही आहेत. काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक सतीश लोंढे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन कांबळे, संतोष सुपेकर, शफी इनामदार यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपाकडून शहाजी खंडागळे, अशोक लाकडे, शराफत पानसरे यांच्या नावांची चर्चा सुरू असून, ओबीसी प्रवर्गातून उषा लाकडे यांच्या नावाची चर्चा आहे. मनसेकडून सतीश गायकवाड, दादा साठे आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. शिवसेनेकडून सतीश कसबे यांच्यासह काही नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभागामध्ये झोपडपट्टींचा परिसर मोठा असल्याने तेथील मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रभागावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तीन सदस्यीय प्रभाग असताना ६ विद्यमान नगरसेवकांचा भाग या प्रभागात येत आहे. (वार्ताहर)