शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत राष्ट्रवादी पुन्हा एकाकी

By admin | Updated: July 6, 2016 03:25 IST

विविध प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकातून तब्बल ३५० कोटी रुपये वर्ग करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रलंबित ठेवून काँग्रेस, भाजपा, मनसे यांनी

पुणे : विविध प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकातून तब्बल ३५० कोटी रुपये वर्ग करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रलंबित ठेवून काँग्रेस, भाजपा, मनसे यांनी महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा मात केली. राष्ट्रवादीच्या सहयोगी सदस्य व स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनीही या प्रस्तावाच्या विरोधात मत देत आपले स्वतंत्रपण कायम ठेवले. हा विषय एका आठवड्यासाठी लांबणीवर टाकला.कदम अध्यक्ष असताना त्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी सुचविलेल्या विविध कामांमध्ये बरीच मोठी कपात केली होती. त्यामुळे विकासकामांना आर्थिक तरतूद कमी पडते आहे, असे कारण देत आयुक्त कुणाल कुमार यांनी तब्बल ३५० कोटी रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला. हे पैसे भांडवली कामांमधून, तसेच नगरसेवकांच्या विकासनिधीमधून वर्ग करण्यात यावेत, असे त्यांनी सुचविले होते. कोणती कामे करणार आहेत, त्याचा खर्च किती, याची सविस्तर यादीही त्यांनी समितीला सादर केली होती. स्वारगेट उड्डाणपूल, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, एचसीएमटीआर रस्ता अशा सुमारे ५१ कामांचा त्यात समावेश असून, त्यासाठी आयुक्तांनी ३५० कोटींची मागणी केली आहे. - सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हा विषय मंजूर करण्याला अनुकूल होते. मात्र, काँग्रेस, भाजपा, मनसे यांच्या सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला. आयुक्तांच्या यादीत स्मार्ट सिटीमधील बरीच कामे आहेत व त्यासाठी निधी देण्याची गरज नाही, असे मत या सदस्यांनी बैठकीत व्यक्त केले. समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी विकासकामे होण्याची गरज असल्याने विषय मंजूर करावा, असे सुचविले. आयुक्त कुणाल कुमार यांनीही बैठकीत सदस्यांना विषयाला मान्यता देण्याची विनंती केली. स्मार्ट सिटीतील कोणतीही कामे यात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेस, मनसे, भाजपाच्या सदस्यांनी त्याला विरोध केला. भांडवली खर्चातून वर्गीकरण करण्याचे कारण नाही, असे त्यांचे म्हणणे होते. गटनेते, पदाधिकारी यांना जास्त निधी मिळाला आहे. त्यांच्या व ज्यांना फक्त ५ कोटी रूपये मिळाले आहेत त्यांच्या निधीत समान वर्गीकरण करणे अन्यायाचे होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे जास्त निधी असलेल्यांना २५ टक्के व इतरांना १५ टक्के अशी उपसूचना मांडण्यात आली. मात्र, या उपसूचनेलाही विरोध होऊन ठराव एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. सध्या सर्व कामांसाठी पुरेसा निधी आहे. सप्टेंबरपर्यंत आर्थिक चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर निधीचे वर्गीकरण करता येईल. सध्या प्रशासन काहीच काम करीत नाही व निधीची मागणी होत आहे, हे चुकीचे वाटत असल्यानेच विरोधात मतदान केले.- अश्विनी कदम, माजी अध्यक्ष, स्थायी समिती