शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा दणदणीत विजय अन् शिवसेनेचा पराभव; उपसभापतीपदी अनिल टिळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 17:06 IST

शिवसेनेच्या सिमा पढेर यांचा १० विरूद्ध १ मतांनी पराभव केला आहे

लोणी काळभोर : हवेली पंचायत समिती उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल टिळेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या सिमा पढेर यांचा १० विरूद्ध १ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे उपसभापतीपदी माळ टिळेकर यांच्या गळ्यात पडली आहे. 

हवेली पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. त्यापैकी ८ सदस्य राष्ट्रवादी कॉग्रेसचे ४ शिवसेनेचे तर भारतीय जनता पक्षाचे २ सदस्य असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेस बहुमतात आहे. आज प्रत्यक्ष निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ भारतीय जनता पक्षाचे १ व शिवसेनेचे ३ सदस्य उपस्थित होते. 

प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांचे उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनिल टिळेकर यांनी तर शिवसेनेच्या वतीने सिमा पढेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदर निवड बिनविरोध व्हावी म्हणून उपस्थितांनी प्रयत्न केले परंतू निर्धारीत वेळेत पढेर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. म्हणून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

आज प्रत्यक्षात १४ पैकी १२ सदस्य उपस्थित होते. यापैकी एकजण तटस्थ राहिल्याने ११ जण मतदानात सहभागी झाले होते. यामध्ये टिळेकर यांना १० तर पढेर यांना फक्त १ मत पडले. यामुळे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी एका सदस्याने टिळेकर यांना मत दिलेचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असल्याने शिवसेनेच्या पढेर या माघार घेतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतू सर्वांचा अपेक्षाभंग झाला. 

टिळेकर यांची उपसभापतीपदी निवड होताच शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुभाष टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसभापतीपदी अनिल टिळेकर म्हणाले, उर्वरित कालावधीत मिळालेल्या संधीचे सोने करून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करून आपण जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPuneपुणे