वेल्ह्यात राष्ट्रवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST2021-07-04T04:07:52+5:302021-07-04T04:07:52+5:30

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, ...

NCP protests in Velha | वेल्ह्यात राष्ट्रवादीची निदर्शने

वेल्ह्यात राष्ट्रवादीची निदर्शने

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, माजी सभापती निर्मला जागडे, तानाजी मांगडे, प्रमोद लोहकरे, रमेश शिंदे, सुधीर रेणुसे, सुनील राजीवडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

वेल्हे राष्ट्रवादीकडून दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दररोज वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून जीवनावश्यक गोष्टीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. पेट्रोल व डिझेल यांच्या किमत आणि जीवनावश्यक वस्तुच्या किमती कमी झाल्या पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

०३ मार्गासनी

तहसील कार्यालयात निवेदन देताना रणजित शिवतरे, संतोष रेणुसे, आनंद देशमाने व इतर.

Web Title: NCP protests in Velha