शेतकऱ्यांचे वीजबील माफ करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांचे पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST2021-09-08T04:15:30+5:302021-09-08T04:15:30+5:30

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक ...

NCP leaders call on Pawar to waive farmers' electricity bills | शेतकऱ्यांचे वीजबील माफ करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांचे पवारांना साकडे

शेतकऱ्यांचे वीजबील माफ करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांचे पवारांना साकडे

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अंकित जाधव यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मंचर येथे भेट घेतली, त्या वेळी ही मागणी केली.

याबाबत सभापती देवदत्त निकम म्हणाले की, गेली २ वर्षे शेतकरी हा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. वीज वितरण कंपनीने वीजबिले भरली नाही म्हणून कृषिपंपाचे वीजजोडणी तोडण्याचे काम सुरू केले आहे. थकीत वीजबिले ३ वर्षांत भरण्याची वीज वितरण कंपनीने धोरण ठरविले आहे. परंतु शेतकऱ्यांना ते मान्य नाही व वीजबिल भरणे ही शक्य होणार नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे. तसेच दिवसा वीज मिळाली पाहिजे असेही त्यांनी शरद पवार यांना सांगितले.

त्याबाबत पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत लक्ष घालावे व मार्ग काढावा अशा सूचना दिल्या. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत बोलू असेही सांगितले. यामुळे कृषी पंपाच्या थकीत वीजबिलाबाबत काय निर्णय होतो? याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Web Title: NCP leaders call on Pawar to waive farmers' electricity bills