राष्ट्रवादीने दिले एका प्रभागात चार अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:25+5:302021-02-05T05:20:25+5:30

चंदननगर : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. येणाऱ्या महापालिकेची निवडणूक समोर ठेवून कार्यकारिणी ...

The NCP gave four presidents in a ward | राष्ट्रवादीने दिले एका प्रभागात चार अध्यक्ष

राष्ट्रवादीने दिले एका प्रभागात चार अध्यक्ष

चंदननगर : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. येणाऱ्या महापालिकेची निवडणूक समोर ठेवून कार्यकारिणी तयार केली आहे. मतदारसंघात तीन गावे येतात आणि चार नगरसेवकांचे सहा प्रभाग आहेत. त्यानुसार प्रभागातील एका नगरसेवकामागे एक प्रभाग अध्यक्ष असे एका प्रभागाला चार अध्यक्षांची नेमणूक केली आहे.

आमदार सुनील टिंगरे, मतदार संघाचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब नलावडे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका रेखा टिंगरे, माजी नगरसेवक आनंद सरवदे, राजेंद्र खांदवे, हर्षद जाधव, शैलेश राजगुरू, नीता गलांडे, राहुल टेकावडे, शेखर हरणे यांच्या उपस्थितीत पदवाटप करण्यात आले. सदाशिव गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर नानासाहेब नलावडे यांनी आभार मानले.

प्रभाग क्र.१ : विश्रांतवाडी-धानोरीचे अध्यक्षपदी

अ) धनंजय टिंगरे, ड) गणेश सुभाष टिंगरे, क) अशिष कदम

ई) धर्मेंद्र राऊत, सुभाष यशवंत खेसे.

प्रभाग क्र.२ : फुलेनगर-नागपूर चाळ

अ) अशोक पाटील, ब) सुरेशराव डेकाटे, क) राहुल गायधने, ड) सागर ननावरे, ई) चंद्रकांत नाईक.

प्रभाग क्र.३ : विमाननगर सोमनाथनगर अध्यक्षपदी

अ) विजय भोसले, ब) संजय सिनलकर, क) तुकाराम गवळी, ड) राहुल बेंगाले, ई) रवींद्र चव्हाण.

प्रभाग क्र.४ : खराडी-चंदननगर अध्यक्षपदी

अ) किरण बाळासाहेब पठारे, ब) वैभव भोसले, क) अनिल बोराटे, ड) वसंत शिवाजी वर्पे.

प्रभाग क्र.५ : वडगाव शेरी-कल्याणीनगर अध्यक्षपदी

अ) प्रमोद पाटील, ब) अभय घोडके, क) योगेश पिसाळ.

प्रभाग क्र.६ : येरवडा- अध्यक्षपदी

अ) बाबासाहेब वैरागर, ब) रवींद्र तामचीकर, क) जुनेद शेख, ड) सागर सोनार, ई) केशव जाधव.

कोट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम तळागळात पोहोचवण्यासाठी व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडण्यासाठी पक्षाची एका नगरसेवकामागे एक प्रभाग अध्यक्ष निवडण्यात आला आहे. सध्या मतदारसंघात पक्षाचे केवळ सहाच नगरसेवक असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी चार अध्यक्षांची कार्यकारिणी केली आहे.

-ॲड. नानासाहेब नलावडे, अध्यक्ष, वडगाव शेरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो ओळ : राष्ट्रवादी काँग्रेसची वडगाव शेरी मतदारसंघाची कार्यकारिणी पद वाटप करताना मतदारसंघाचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे व मान्यवर.

Web Title: The NCP gave four presidents in a ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.