राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा राजीनामा

By Admin | Updated: February 24, 2017 03:49 IST2017-02-24T03:49:40+5:302017-02-24T03:49:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला

NCP city president Vandana Chavan resigns | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा राजीनामा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. राजीनामा दिला असला तरीही पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला जबरदस्त धक्का बसला. पक्षाच्या जागा ५३ वरून ४० वर घसरल्या. अनेक ठिकाणी पक्षाची पॅनलच्या पॅनल पराभूत झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपवली होती. पक्षाचे नेते अजित पवार पिंपरी- चिंचवड आणि राज्यात व्यस्त असल्याने चव्हाण याच पक्षाचा चेहरा होता.

Web Title: NCP city president Vandana Chavan resigns