शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:03 IST

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

पुणे : ज्या मनुस्मृतीच्या आधारे सत्ताधारी देशात अराजकता पसरवत आहेत. गरीब शेतक-यांना नाडत आहेत. देशातील वातावरण दुषित करीत आहेत. त्यांना योग्य समज देण्याकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

गणेश कला क्रीडा येथे झालेल्या या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, राजलक्ष्मी भोसले,  रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ’’लोगो की मांग स्वीकार करो इव्हीएम बंद करो, बंद करो’’ , संविधान के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में, संविधान बचाव देश बचाव, इव्हीएम बचाव देश बचाव, मनुस्मृती हाय हाय, मनुस्मृतीचे दहन झालेच पाहिजे, मनुस्मृती मुर्दाबाद.... अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी देवून आपला निषेध व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून देशात अराजकता व सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना राज्यसरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोरगरिब शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्याप्रती उदासीन असणा-या सरकारला जाग आणण्याकरिता मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. याबरोबरच येत्या निवडणूकांमध्ये इव्हीएम मशीनऐवजी बँलट पेपरचा वापर केला जावा. अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे