हवेलीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीने मारली बाजी
By Admin | Updated: March 15, 2017 03:20 IST2017-03-15T03:20:32+5:302017-03-15T03:20:32+5:30
हवेली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या वैशाली गणेश

हवेलीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीने मारली बाजी
लोणी काळभोर : हवेली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या वैशाली गणेश महाडीक यांची सभापतीपदी तर अजिंक्य सुरेश घुले यांची उपसभापदी निवड झाली.
हवेली पंचायत समितीचे २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर ऊर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे भरून निघाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमतात आहे. त्यामुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले.
भारतीय जनता पक्षाचे कोंढवे धावडे गटातून निवडून आलेले भाजपाचेच बंडखोर उमेदवार बाळासाहेब मोकाशी यांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेसमवेत युती करून सभापती व उपसभापतिपद हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, परंतु, या निवडणुकीत शिवसेनेने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे करून भाजपाला कात्रजचा घाट दाखवल्याने भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी पडले.
पुणे येथील जुनी जिल्हा परिषदच्या महात्मा गांधी सभागृह येथे संपन्न झालेल्या या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून शहाजी पवार यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ व संदीप कोहीनकर हे उपस्थित होते. सकाळी १० ते १२ या वेळेत इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली. यामध्ये सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गण क्रमांक ७६ सोरतापवाडी गणातून निवडून आलेल्या वैशाली गणेश महाडीक, शिवसेनेच्या गण क्रमांक ८१ शिवणे गणातून निवडून आलेल्या उषा सुभाष नाणेकर तर भाजपाच्या गण क्रमांक ९३ मांगडेवाडी या गणातून निवडून आलेल्या सीमा संतोष पढेर यांनी तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे गण क्रमांक ८१ मांजरी बुद्रुक येथून निवडून आलले अजिंक्य सुरेश घुले, शिवसेनेचे गण क्रमांक ८५
येथून निवडून आलेले राजीव रामदास भाडाळे तर मांगडेवाडी गण क्रमांक
९३ मधून निवडून आलेले
भाजपाचे अनिरुद्ध पंडित यादव
यांनी नामनिर्देशन पत्र दाखल
केली होती.
दुपारी दोन वाजता सभेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना दाखल करण्यात आलेली नामनिर्देशनपत्रे दाखवण्यात आली; त्यानंतर करण्यांत आलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये कोणाचाही अर्ज बाद न झाल्याने दोन्ही पदांसाठी
तिरंगी लढत होणार, हे स्पष्ट
झाले होते. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ देण्यात आला. विहीत वेळेत कोणीही माघार न घेतलेल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले होते. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. एका पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने सवार्नुमते हात वर करून मतदान घेण्यात आले.
प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यावेळी एकून २६ मतदारांपैकी शिवसेनेचे वाघोली गण क्रमांक ७१ मधून निवडून आलेले सर्जेराव भिकाजी वाघमारे वगळता इतर सर्व २५ जण उपस्थित होते. यावेळी सभापतीपदासाठी झालेल्या मतदानांत राष्ट्रवादीच्या वैशाली महाडीक यांना १४, शिवसेनेच्या उषा नाणेकर यांना ६ तर भाजपाच्या सीमा पढेर यांना ५ मते पडली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अजिंक्य घुले यांना १५, शिवसेनेचे राजीव भाडाळे यांना ४ तर भाजपाचे यादव यांना ६ मते पडली. (वार्ताहर)