शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

राष्ट्रवादीचा महागाईविरोधात हल्लाबोल : राजगुरुनगरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 02:13 IST

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतीमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी होण्याबाबत सरकारच्या विरोधात मंगळवार (दि.२८) रोजी तहसीलदार कचेरीसमोर महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केले.

राजगुरुनगर : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतीमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी होण्याबाबत सरकारच्या विरोधात मंगळवार (दि.२८) रोजी तहसीलदार कचेरीसमोर महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केले.तालुक्यातील सर्वसामान्य माणूस, कामगार, व्यापारी, शेतकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक इत्यादी नागरिकांसह सर्व घटकांची आर्थिक घडी ढासळल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शेतीमालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. आपल्या न्याय्य मागण्या मांडण्यासाठी व या निष्क्रिय सरकारचा निषेध माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.राजगुरुनगर एसटी स्टँड येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली.कर्जमाफी करताना शेतकºयांची पिळवणूक या सर्वच बाबतीत सरकारचे चुकीचे धोरण व निर्णय यामुळे जनता पूर्णपणे हतबल झाली असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुका महिला अध्यक्षा साळूबाई मांजरे, परिषद सदस्या निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, विलास कातोरे, राजाराम लोखंडे, राहुल नायकवडी, वैभव घुमटकर, विलास मांजरे, प्रकाश कुºहाडे, अरुण चौधरी, शांताराम सोनवणे, सुरेखा मोहिते, वैशाली गव्हणे, बाळासाहेब सांडभोर, धैर्यशील पानसरे, विनायक घुमटकर, सुरेश शिंदे, मंगल चांभारे, नंदाताई सुकाळे, मंदा शिंदे, अनिता हळये, उमा शेटे, अशोक मांजरे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोणतीही दखल नाहीगेल्या ३ वर्षांत राज्यामधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलने होऊनही सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. वाढती महागाई, पेट्रोल व डिझेलची दरवाढ, भरमसाट वाढलेले वीजबिल, घरगुती स्वयंपाकाचा गॅसची दरवाढ, वाढती बेरोजगारी, शेतक-यांच्या शेतीमालाला नसलेला भाव, बंद पडत चाललेले उद्योगधंदे, ‘जीएसटी’मुळे वाढलेली प्रचंड करवाढ, सर्वच ठिकाणी कामगारविरोधी धोरण,, सहकारविरोधी धोरण, नोटाबंदीचा फसलेला निर्णय.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे