शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:11 IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे.

पुणे : साहित्य अकादमी पुरास्कार प्राप्त इंग्रजी लेखिका नयनतारा सेहगल यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बाेलवण्यात आले हाेते, परंतु त्यांच्या सराकारवर टीका करणाऱ्या भाषणामुळे त्यांना पाठवलेलं निमंत्रण मागे घेण्यात आल्याचे बाेलले जात आहे. सरकारने आयाेजकांवर दबाव टाकून त्यांना पाठवलेले निमंत्रण मागे घ्यायला लावले अशी टीकाही सर्वच क्षेत्रातून केली जात आहे. नयनतारा सेहगल या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार नसल्या तरी त्या जे भाषण करणार हाेत्या ते सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांचे हेच भाषण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध ठिकाणी जात तेथील विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे ज्या भाषणासाठी सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले तेच भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. 

    यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. डाॅ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आले हाेते. परंतु संमेलन सुरु हाेण्याच्या काहीच दिवस आधी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना पाठविण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आले. सेहगल यांच्या अप्रकाशित भाषणात त्यांनी सराकरवर जाेरदार टीका केली हाेती. देशात चाललेली झुंडशाही ही सरकार पुरस्कृत आहे असे परखड मत त्यांनी त्यांच्या भाषणात मांडले हाेते. त्यांचे निमंत्रण मागे घेतले असले तरी त्यांचे भाषण सर्वच वर्तमानपत्र आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाेहचले आहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पुराेगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साेमवारी सेहगल यांच्या भाषणाच्या 300 प्रती विद्यापीठात वाटल्या. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टींन, जयकर ग्रंथालय, ललित कला केंद्र, विद्यार्थी वसतीगृह या ठिकाणी या प्रतिंचे वाटप करण्यात आले. या प्रती वाटणारा आकाश दाैंडे म्हणाला, नयनतारा सेहगल यांच्या भाषणामुळे त्यांचे निमंत्रण नाकारणे म्हणजे हा एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. सराकराने त्यांचे भाषण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे उलटेच झाले. लाेक आता सेहगल यांचे साहित्य माेठ्याप्रमाणावर वाचू लागले आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या साहित्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. राजकरण्यांच्या दबावाला साहित्यिकांनी बळी पडणे याेग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणाच्या 300 प्रती आम्ही विद्यापीठात वाटल्या. विद्यार्थी आणि नागरिकांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र