शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात; अतिदुर्गम तोरण्यावरुन छबीन्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 4:32 PM

मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली  शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली.

ठळक मुद्देदसºयादिवशी देवीचे शिवकालीन दागीने, मौल्यवान अलंकार व देवीची मूर्ती यांची सन्मानपूर्वक पालखीतून गडावरुन वेल्ह्यात मिरवणूक काढली. तोरणा किल्ल्यावरील मेंगाई मंदिरात येथील तरुणांनी मशालींची सलामी दिलीयावर्षी प्रथमच गडावरील देवीसाठी वेल्हे ग्रामास्थांतर्फे नवीन पालखी अर्पण केली

वेल्हे  : तालुक्यातील जनतेची आणि समस्त मावळ्यांची कुलस्वामिनी व तोरणागडाची गडदेवता असलेल्या मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली  शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली.  मेंगाई देवस्थानचे मानकरी शंकर भुरुक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शिवकालीन पद्धतीनुसार प्रथमच नवरात्रोत्सव संपन्न झाला आहे.   दसºयादिवशी देवीचे शिवकालीन दागीने, मौल्यवान अलंकार व देवीची मूर्ती यांची सन्मानपूर्वक पालखीतून गडावरुन वेल्ह्यात मिरवणूक काढली. घटस्थापनेपासून ते विजायादशामीपर्यंत वेल्ह्यातील मेंगाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मेंगाई मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. दसºयादिवशी गावामधून देवीच्या छाबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. तसेच तोरणा किल्ल्यावरील मेंगाई मंदिरात येथील तरुणांनी मशालींची सलामी दिली.  गडावरील मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावर्षी प्रथमच गडावरील देवीसाठी वेल्हे ग्रामास्थांतर्फे नवीन पालखी अर्पण केली असून या पालखीतून शिवकालीन मौल्यवान दागिने, देवीचे अलंकार, गडावरून खाली आणून या पालखीची दसार्यादिवाशी गावातून  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.१९३९ सालापर्र्यंत गडाचे मानकरी व रखवालदार असलेली सर्व गडकरी मंडळी नवरात्रोत्सवानिमित्त गडावरील देवीचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडात. मात्र संस्थाने खालसा झाल्यानंतर १९४० पासून तोरणागड दुर्लक्षित झाला. यावेळी गडकºयांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मेंगाई देवीला अर्पण केलेले दागिने, मौल्यवान अलंकार, सरकारजमा केले. तेव्हापासून काही काळ उत्सवाची परंपरा खंंडीत झाली होती. मात्र आता वेल्ह्यातील युवकांनी नवरात्रातील गडावरील मेंगाईचा उत्सव करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.- शंकर भुरुक, मानकरी, मेंगाई देवस्थानबंद पडलेली परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी वेल्ह्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा करुन गडावरील देवस्थानसाठी नवीन पालखी बनवली. या पालखीला दसºयादिवशी देवीच्या चरणी अर्पण केले. या उत्सवासाठी देवीचे मानकरी शंकर  भुरुक, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, सुनिल राजीवडे, पुजारी ज्ञानेश्वर वेगरे, देवस्थान चे मानकरी संजय पवार- पाटील, रामचंद्र राजीवडे, मंगेश पवार, अनिल भुरुक, संतोष मोरे, वेल्ह्याच्या सरपंच कल्पना वेगरे, प्रकाश गायखे, विकास कदम आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्री