राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास सुरुवात
By Admin | Updated: March 9, 2015 00:57 IST2015-03-09T00:57:03+5:302015-03-09T00:57:03+5:30
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त येथील उद्योगनगरीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. सप्ताह ११ मार्चपर्यंत आहे

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास सुरुवात
पिंपरी : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त येथील उद्योगनगरीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. सप्ताह ११ मार्चपर्यंत आहे. कामगारांनी घ्यावयाची सुरक्षा, घ्यावयाची दक्षता, प्रथमोपचार, प्रात्यक्षिके, शून्य अपघात, फायर फायटिंग, वृक्षारोपण, व्याख्यान, गुणवंत कामगारांचा सत्कार, वेगवेगळ्या स्पर्धा आदी उपक्रम आयोजित केले आहेत.
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, तसेच तळेगाव, चाकण एमआयडीसी आणि परिसरात लहान-मोठ्या शेकडो कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ ते ११ मार्च या कालावधीत साजरा केला जात आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेसंदर्भात फलक व झेंडे लावले गेले आहेत. कंपनीच्या आवारात जनजागृतीपर भित्तीचित्र झळकत आहेत. सुरक्षा ध्वजाचे रोहण करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सुरक्षिततेची शपथ कामगार आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली.
ंपिंपरी येथील थिसेन कु्रप इंडस्ट्रीज कंपनीत मनुष्यबळ विकास उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर व थिसेन क्रुप इंडस्ट्रीज वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अनिल गोडसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कामगार, अधिकारी, अभियंत्यांना सुरक्षिततेची सामुदायिक शपथ देण्यात आली. सुरक्षा अधिकारी मनीष गावडे यांनी वाचन केले. सप्ताहानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचबरोबर टाटा मोटर्स, बजाज अॅटो, किर्लोस्कर आॅइल्स इंजिन्स, थरमॅक्स, एसकेएफ आदी प्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)