राष्ट्रीय लोकअदालत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:02+5:302021-04-06T04:11:02+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (दि. १०) होणारी राष्ट्रीय लोकअदालत रद्द केली ...

राष्ट्रीय लोकअदालत रद्द
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (दि. १०) होणारी राष्ट्रीय लोकअदालत रद्द केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत लोकअदालतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले दावे, दाखल पूर्व दावे तडजोडीअंती निकाली निघावे यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. १० एप्रिल रोजी देखील लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे ही लोकअदालत रद्द करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (दि. १०) होणऱ्या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांना लवकरच पुढच्या तारखा देणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी दिली.