‘स्मार्ट सिटी’साठी महापालिकेचा ‘नॅसकॉम’शी करार

By Admin | Updated: November 7, 2015 03:42 IST2015-11-07T03:42:19+5:302015-11-07T03:42:19+5:30

संगणकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉम बरोबर महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार केला

Nasscom's agreement with the Municipal Corporation for 'Smart City' | ‘स्मार्ट सिटी’साठी महापालिकेचा ‘नॅसकॉम’शी करार

‘स्मार्ट सिटी’साठी महापालिकेचा ‘नॅसकॉम’शी करार

पुणे : संगणकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉम बरोबर महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’
संदर्भातील तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार केला. ‘आयसीटी सोल्युशन्स व आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान’ याबाबत ‘स्मार्ट सिटी’मध्ये येणाऱ्या प्रश्नांसाठी नॅसकॉम महापालिकेला सहकार्य करणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार व नॅसकॉमचे वरिष्ठ संचालक मनोजित बोस या वेळी उपस्थित होते. प्रामुख्याने स्मार्ट सिटी अंतर्गत शहर विकासकामांबाबत येणाऱ्या अडचणींमध्ये नॅसकॉम महापालिकेला तंत्रज्ञानविषयक सहकार्य करेल. (प्रतिनिधी)

Web Title: Nasscom's agreement with the Municipal Corporation for 'Smart City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.