शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील नसरापूर ते चांदणी चौक रस्ता मृत्यूचा सापळा; शिवसेना करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 14:44 IST

नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षीतव सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देया रस्त्यासाठी आंदोलनांशिवाय पर्याय नाही : चंद्रकांत मोकाटे'कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी व्हावी ही शिवसेनेची भूमिका'

पुणे : नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षीतव सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील अपघातांची सरासरी काढली तर त्यावरील अपघातांमध्ये सरासरीने रोज एकजण मृत्यूमुखी पडत आहे. शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यात शिवसेनेत मरगळ होती हे मान्य करून मोकाटे म्हणाले, ‘‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराला नवी कार्यकारिणी मंजूर केली आहे. आता शहर प्रमुख म्हणून आम्ही सर्व मिळून शिवसेनेला शहरात पुन्हा नवी ताकद निर्माण करून देणार आहोत. त्याची सुरूवात नसरापूर ते चांदणी चौक या रस्त्यासाठी आंदोलन करून करत आहोत. शिवसेनेच्या पद्धतीनेच हे आंदोलन करण्यात येईल.’’यावेळी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे प्रमुख रमेश कोंडे आदी उपस्थित होते. पुलाला कठडे नाहीत, रस्ता खराब झाला आहे. महिनाभरापुर्वी उड्डाण पुलाच्या कामाला सुरूवात केली, मात्र अद्याप जागा संपादन झालेले नाही. ३१ डिसेंबरपूर्वी ते झाले नाही तर पुलाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्याचे काय झाले याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे आता या रस्त्यासाठी आंदोलनांशिवाय पर्याय नाही असे मोकाटे यांनी सांगितले.शहराच्या हिताचे प्रश्न उपस्थित करून शिवसेना आता रस्त्यावर उतरणार आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत व विरोधही करत आहोत यात काहीच विरोधाभास नाही. आम्ही जनहितासाठी काम करतो आहेत. त्याला सरकारकडून बाधा येत असेल तर त्यांच्या विरोधातही बोलण्यासाठी कचरणार नाही असे मोकाटे यांनी सांगितले. महापालिकेतील नगरसेवकांकडून संघटनेला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळते आहे. त्यांनाही आंदोलनात बरोबर घेणारच आहोत असे ते म्हणाले. श्विसेनेचा मेट्रो ला विरोध नाही, मात्र शिवसृष्टीचा ठराव ज्या जागेवर झाला आहे, त्याच कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी व्हावी ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही त्यासाठीच आग्रही राहणार आहोत. खुद्द महामेट्रो कंपनीनेही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती, असे मोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :kothrudकोथरूडPuneपुणे